बांबवडेत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:32+5:302021-02-05T07:03:32+5:30
बांबवडे : बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णवाहिका ४२ गावे व वाड्या-वस्त्यावरील लोकांसाठी जीवनदायी ...

बांबवडेत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा
बांबवडे : बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णवाहिका ४२ गावे व वाड्या-वस्त्यावरील लोकांसाठी जीवनदायी ठरतील, असे प्रतिपादन आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी केले.
बांबवडे तालुका शाहूवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या तीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा युवानेते रणवीर सिंग गायकवाड, जि. प. सदस्य विजय बोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास शाहूवाडी पंचायत समिती सभापती सुनीता पारळे, उपसभापती विजय खोत, सुरेश पारळे, सयाजी निकम, विष्णू यादव, बाळासाहेब खुटाळे, पंडितराव शेळके, चंद्रप्रकाश पाटील, डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. दीपाली जद, सी. पी. आर. जिल्हा समन्वयक एकनाथ पाटील, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.