आंबेओहोळ धरणग्रस्तांनी वहाणांच्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:18+5:302020-12-05T04:57:18+5:30

! फोटो ओळी : आंबे ओहळ, ता. आजरा येथे वाहनांच्या आडवे पडून काम बंद पाडताना धरणग्रस्त . उत्तूर. ...

Ambeohol dam victims | आंबेओहोळ धरणग्रस्तांनी वहाणांच्

आंबेओहोळ धरणग्रस्तांनी वहाणांच्

! फोटो ओळी : आंबे ओहळ, ता. आजरा येथे वाहनांच्या आडवे पडून काम बंद पाडताना धरणग्रस्त

.

उत्तूर. : आंबेओहोळ प्रकल्प, ता. आजरा येथील प्रकल्पाचे पुनर्वसस न झाल्याने वाहनांच्या आडवे पडून काम बंद पाडले. पुनर्वसन होत नाही तोपर्यंत काम करू नका, अशी भूमिका धरणग्रस्तांनी मांडली होती, पण त्यांना न जुमानता दुपारी तीन वाजता प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे कळताच प्रकल्पग्रस्त सायंकाळी पाच वाजता धरणावर आले.

प्रकल्प अभियंता स्मिता माने, कृष्णा खोरेचे अधिकारी खट्टे, प्रकल्पाचे अधिकारी बारदेस्कर व धरणग्रस्त यांच्यात पुनर्वसन प्रश्नावरून बाचाबाची सुरू झाली. धरणग्रस्त आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला. आमचं पुनर्वसन होणार नसेल तर आम्हाला मरू द्या, असे म्हणत धरणग्रस्तांनी वाहनांच्या आडवे झोपून प्रकल्पाचे काम बंद पाडले.

प्रकल्पाचे काम सांयकाळी पाच वाजता बंद पाडल्यानंतर पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवाजी गुरव, सरपंच सतोंष बेलवाडे, सचिन पावले, महादेव खाडे, श्रीराम चौगुले, बाबू नाईक, आदींसह धरणग्रसांनी काम बंद पाडले.

X. डोक्यात दगड मारून घेतला x.

धरणग्रस्तांचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी पुनर्वसनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन केले होते. त्यांनी स्वतःला डोक्यात दगड मारून घेतला. त्यात ते जखमी झाले.

Web Title: Ambeohol dam victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.