शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाईच्या दागिन्यांना सुवर्ण झळाळी, विशेष अन् नित्य पूजेत वापरले जाणारे दागिने कोणते..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:20 IST

देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्य व नैमित्तिक अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. किरीट गदा, चिंचपेटी, बोरमाळ, ठुशी या अलंकारांसह सोन्याची पालखी, सोन्याचे मोर्चेल, सोन्याचा सिंह, गदा यांनाही सुवर्ण झळाळी आली.देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही. फक्त रिठ्याचे पाणी आणि बारीक वाळूच्या साह्याने दागिन्यांचा लखलखाट आणला जातो. आज शुक्रवारी अंबाबाईच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वस्तूंची स्वच्छता केली जाणार आहे.शारदीय नवरात्रौत्सवाला आता तीन दिवस राहिल्याने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. वर्षातून एकदा नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या खजिन्यातील सर्व अलंकारांची स्वच्छता केली जाते. अंबाबाईच्या खजिन्यात आदिलशाही काळातील, यादव, शिलाहारकालीन तसेच ऐतिहासिक दागिने आहे.सोन्याचे दागिने वर्षभरातील रोजच्या पूजेत वापरले जातात. तर रत्नजडित अलंकार हे नवरात्रौत्सवात तसेच विशेष सालंकृत पूजेसाठी वापरले जातात. या दोन्ही वापरातील अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. अंबाबाईच्या खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर यांच्या देखरेखीखाली महेश कडणे यांच्यासह गजानन कवठेकर, दादा कवठेकर व कारागिरांनी ही स्वच्छता केली. आज शुक्रवारी चांदीच्या साहित्याची स्वच्छता केली जाईल.

अंबाबाईच्या नित्य पूजेत वापरले जाणारे दागिनेसोन्याचे किरीट, गदा, पावले, चिंचपेटी, बोरमाळ, कंठी, मंगळसूत्र, नथ, कानाचे मोरक्षी, कुंडले, बोरमाळ, मोहराची माळ, चंद्रहार, चाफेकळी हार, ठुशी, म्हाळूंग, कवड्याची माळ, सिंह

विशेष पूजेत वापरले जाणारे दागिनेनवरत्नांचे जडावाचे किरी, जडावाचे मोरपक्षी, कुंडल, चिंचपेटी, पेंडल, लप्पा हार, सात पदरी कंठी, सोळा पदरी कंठी, श्रीयंत्र, मोत्याची माळ.

लाकडी रॅम्पअंबाबाई मंदिरात जाताना महाकाली मंदिरापासून ते कासव चौक, सरस्वती मंदिरापर्यंत लाकडी रॅम्प करण्यात येत आहे. मंदिरातील खालचे दगड खाली-वर असल्याने भाविकांचा तोल जाऊ नये म्हणून हे रॅम्प बनवण्यात येत आहेत.

दक्षिण दरवाजासमोर गेटअंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर अनेक चारचाकी वाहने येत असल्याने भाविकांना फिरण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे येथे मोठे गेट तसेच उभे खांब बसवले आहेत.