शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले अंबाबाई मंदिर; नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:13 IST

सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली

कोल्हापूर : दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवणारी आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवार (दि.३) पासून मंगलमयी वातावरणात प्रारंभ होत आहे. यानिमित्त रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने आणि विद्युत रोषणाईने मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी अंबा माता की जय, अंबाबाईच्या नावानं चांगभलं, आई राजा उदो उदो करत देवीच्या जागराला सुरुवात केली. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली.देशातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता असलेल्या श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे देशभरातील भाविकांसाठीचे श्रद्धास्थान. गुरुवारी(दि.३) सकाळी साडेआठ वाजता श्रीपूजकांचे मूळ घराणे मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना झाली. त्यानंतर देवीचा शासकीय अभिषेक होईल. दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर देवीची सालंकृत रुपातील पूजा बांधली जाईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा होईल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयाच्या दारात सकाळपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.

फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले मंदिरपुण्याच्या हिडदुगी यांच्या वतीने अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडू फुलांच्या माळा, देशीविदेशी जातींचा फुलोत्सव येथे रंगला आहे. यासह मंदिराची शिखरे, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईने मंदिर अधिकच सुंदर झाले आहे.

शेतकरी बझारमध्ये दर्शन मंडप सुरू..आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने बुधवारी शेतकरी बझारची इमारत ताब्यात घेतली. इमारतीची स्वच्छता झाल्यानंतर सायंकाळी बॅरिकेड्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या. भाविकांना अंबाबाईचे थेट दर्शन व्हावे यासाठी मोठा एलईडी स्क्रीन बसविण्यात आला आहे. परिसरावर सीसीटीव्हींचा वॉच असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरNavratriनवरात्री