शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

करवीर निवासिनी अंबाबाई कोल्लुर मुकांबिका रुपात, शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:37 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.

ठळक मुद्देअंबाबाई कोल्लुर मुकांबिका रुपातशारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईचा नवरात्रौत्सव जगप्रसिद्ध आहे. देवीची रोज बांधली जाणारी पूजा हे या नवरात्रौत्सवाचे खास वैशिष्ट्य असते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता श्रीपाद मुनिश्वर यांच्या हस्ते गाभाऱ्यात घटस्थापना झाली, या विधीनंतर झालेल्या तोफेच्या सलामीने खऱ्या अर्थाने देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते देवीची शासकीय पूजा झाली.

श्री जोतिबा डोंगरावर श्री जोतिबाची विड्याच्या पानात बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा महादेव गावकर यांनी बांधली 

दुपारच्या आरतीनंतर श्री अंबाबाईची कोल्लूर मुकांबिका रुपात पूजा बांधण्यात आल.ी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कोल्ल्रू गावी मुकांबिकेचे मंदिर आहे. ही देवी शंख, चक्र, वरद आणि अभय मुद्रा धारण केलेली आहे. कोल महर्षींच्या तपामुळे प्रसिद्ध झालेल्या कोल्लूर क्षेत्री मुकासुराचा वध करणारी म्हणून कोल्लुर मुकांबिका अशी या देवतेची ख्याती आहे.

कम्हासुराने घोर तप सुरू केले, त्यावेळी त्याची वाचा जावी यासाठी सरस्वतीने त्याला मुके केले म्हणून तो मुकासूर झाला. त्याच्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून पराशक्तीचा अवतार झाला. तिने मुकासुराला मारले आणि तिला मुकांबिका नाव मिळाले. देवीसमोर स्वर्णरेखांकित शिवलिंग असून ते शिव व शक्तीचे प्रतिक आहे. ही देवी सिंहवाहिनी असून कर्नाटक, केरळ, तमिळनाडू येथे मोठा भक्तवर्ग आहे. अंबाबाईची या रुपातील पूजा अनिल गोटखिंडीकर, सचिन गोटखिंडीकर, आशिष गोटखिंडीकर यांनी बांधली.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर