शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘दक्षिण’चा पुढचा आमदार अमल महाडिकच - खासदार धनंजय महाडिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:02 IST

कळंबा : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र ...

कळंबा : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा देशात आणि राज्यात भाजप निर्विवाद सत्तेत येणार आहे. जिल्ह्यात भगवे वादळ उठले असून अमल महाडिकच ‘दक्षिण’चा पुढचा आमदार असणार हे निश्चित असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. राजलक्ष्मीनगर येथे भाजपच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अमल महाडिक होते.माजी आमदार अमल महाडिक यांनी येत्या पालिका निवडणुकीत भाजपची निर्विवाद सत्ता आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी नगरसेवक विजय खाडे, सूत्रसंचालन विनायक कुलकर्णी, आभार प्रदर्शन सुधीर राणे यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम संग्राम पाटील, तृप्ती पाटील, सुधीर राणे, मिथुन मगदूम यांसह भाजप पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

दक्षिणच्या आमदारकीचा गुंता निकालीआमदार अमल महाडिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत दक्षिणसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली. त्यामुळे प्रश्न उरलेच नाहीत. आताचे आमदार किती विकासकामे करतात माहीत नाही. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून अमल महाडिक उमेदवार असणार आणि निश्चितच निवडून येणार, असे सांगत खासदार धनंजय महाडिक यांनी दक्षिणची लढत स्पष्ट केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाAmal Mahadikअमल महाडिकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक