शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

सदैव राहो लक्ष्मीचा वास..लक्ष्मी कुबेर पूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:02 PM

मांगल्याचे प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीत गुरुवारी शहरातील घराघरांत आणि दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी-कुबेर पूजन सोहळा साजरा झाला. त्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.

कोल्हापूर , दि. १९ : मांगल्याचे प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीत गुरुवारी शहरातील घराघरांत आणि दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी-कुबेर पूजन सोहळा साजरा झाला. त्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.

अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रदोषकाळी लक्ष्मीचा होणारा संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते, असे मानतो. त्यानुसार दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त संचार करणाऱ्या या लक्ष्मीचे मनोभावे स्वागत कार्यात घरा-घरांतील सुवासिनी महिला दुपारी तीन वाजल्यापासून व्यस्त होत्या.

स्वागतासाठी त्यांनी आपल्या दारात मोठे-मोठ्या विविधरंगी रांगोळ्याही काढल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास मात्र घरा-घरांत लक्ष्मीच्या प्रतिमेच्या पूजनाची धांदल उडाली. कर्त्या व्यक्तींबरोबरच सर्वांनीच या पूजेत स्वत:ला झोकून दिले. पैशांच्या ताटांत दागिने अर्पण केलेल्या लक्ष्मी व कुबेराच्या प्रतिमेची पूजा करून नंतर लाह्या, भेंड-बत्तासे, विविध प्रकारची फळे, केळी आणि फराळातील गोडधोड पदार्थ आदींचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्याचबरोबर घर व अंगणाची स्वच्छता करणाऱ्या झाडूंचेही लक्ष्मीसोबत पूजन करण्यात आले.

लक्ष्मीचा आरती सोहळा झाल्यानंतर मात्र गल्लो-गल्ली फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. घरातील लहानांपासून ते अगदी ज्येष्ठ मंडळींनीही फटाके उडविण्याचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिलेल्या या आतषबाजीमुळे आसमंत उजळून निघाला. उशिरापर्यंत सुरूच राहिलेल्या आतषबाजीमुळे तेजाळून निघालेल्या शहरातील गल्लो-गल्ल्यांमध्ये एका वेगळ्याच उत्साहाची नांदी झाली.

कार्यालये, व्यावसायिक, दुकानदारांनीदेखील सायंकाळी व रात्री लक्ष्मीपूजन केले. सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या सराफांच्या पेढीवर अधिक धार्मिक विधींनी ही पूजा करण्यात आली. झेंडूच्या फुलांच्या माळा, विद्युत माळा, पणत्या लावून दुकानांना सजविण्यात आले होते. काही दुकानांमध्ये एका बाजूला लक्ष्मीपूजन आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना सेवा असे चित्र होते. दुकानांमध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या या खास पूजनाला सर्व कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तूचे आगमनवर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्याला प्रत्येक कुटुंबात एका तरी नवीन वस्तूचे आगमन होते. या दिवशी वास्तू, विविध वस्तूंची खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यांची नोंदणी करण्यासह त्या पाडव्याच्या मुहूर्तावर ताब्यात घेण्यासाठी वाहनांची शोरूम्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचरसारख्या शोरूममध्ये आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची अनेकांची धावपळ सुरू होती.

टॅग्स :diwaliदिवाळीMarketबाजार