शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

गरिबांना घरकुल देताय की बंगला?, दोन खोल्यांसाठी वर्षही पुरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:44 IST

घरकुल मंजूर झाल्यानंतर वर्षभरामध्ये हे घर बांधून पूर्ण व्हावे, अशी शासनाने अट घातली आहे; परंतु सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘ब’ यादीतील १४९५ घरे वर्ष झाले तरी बांधून पूर्ण झालेली नाहीत.

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी केली जाते. यातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून घर बांधकामासाठी निधी मिळतो. घरकुल मंजूर झाल्यानंतर वर्षभरामध्ये हे घर बांधून पूर्ण व्हावे, अशी शासनाने अट घातली आहे; परंतु सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘ब’ यादीतील १४९५ घरे वर्ष झाले तरी बांधून पूर्ण झालेली नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्राधान्ययादीमध्ये घरकुल योजना अग्रस्थानी ठेवली आहे. त्यामुळे राज्य पातळीवरूनही याचा आढावा सातत्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे घेत असतात. राज्यामध्ये तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे काम चांगले आहे; परंतु तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे घरबांधणीला उशीर होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना आणि महापूर यांचा मोठा अडथळा यामध्ये निर्माण झाला होता.ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचे या योजनेतून किती काम झाले यावर रँकिंग ठरविले आहे. रोज या विभागाच्या सॉफ्टवेअरवर किती घरे बांधून पूर्ण झाली आहेत, याची माहिती अपलोड केली जाते. त्यावर रोजचे रँकिंग ठरविले जाते. याच धर्तीवर तालुक्यांचेही रँकिंग ठरविण्यात आले आहे.कोरोना, पुराची अडचणगेल्या दोन वर्षांत घरकुल बांधकाम योजनेत कोरोना आणि महापुराचा बसलेला तडाखा या कारणांमुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याआधी केवळ जागांच्या वादामुळे काही घरकुलांना विलंब होत होता; परंतु पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत कामेच बंद ठेवण्यात आल्याने त्याचा परिणाम झाला. तसेच करवीर, शिरोळ, हातकणंगलेसह अन्य तालुक्यांमध्ये महापूर आल्यानेही त्याचा परिणाम घरकुल उभारणीवर झाला आहे.बांधकामासाठी गरिबांवर झाले कर्जआधी ठरावीक टप्प्यापर्यंत घराचे बांधकाम झाल्यानंतर मगच शासनाकडून अनुदान अदा केले जाते. त्यामुळे काही ठिकाणी अशा कामाला सुरुवात झाली. नंतर कोरोना, महापुरासारख्या किंवा घरगुती अडचणी आल्या. काम थांबले आणि आता त्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याची काळजी काहीजणांना लागून राहिली आहे. तालुका          रँकिंगआजरा            १गगनबावडा     २शाहूवाडी        ३हातकणंगले    ४शिरोळ           ५कागल            ६आजरा           ६पन्हाळा          ७भुदरगड         ७गडहिंग्लज      ८करवीर           ९चंदगड           १०

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी?तालुका           लाभार्थीआजरा            ८८गगनबावडा     ६२भुदरगड         १६०चंदगड           ११६गडहिंग्लज      २९०हातकणंगले    २२९कागल            १८१करवीर           १७७पन्हाळा          १४१राधानगरी       १६६शाहूवाडी        १२३शिरोळ           ३०७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHomeसुंदर गृहनियोजन