शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

अंबाबाई मंदिर विकास आराखडा दाखवा तरी, सतेज पाटील यांचे पालकमंत्र्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 5:22 PM

'कोल्हापुरातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी मदत होईल'

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा तयार करण्याचा पालकमंत्री दीपक केसरकर प्रयत्न करत आहेत. हा विकास आराखडा कसा आहे तो दाखवावा, तो तयार करत असताना किमान शहरातील आमदारांना विश्वासात तरी घ्यावे, अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.कोल्हापूरचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या. कोल्हापुरातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी मदत होईल, असा टोमणाही त्यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.मी पालकमंत्री असताना केशवराव भोसले नाट्यगृहात बसून शहरातील नागरिकांना अंबाबाई मंदिर परिसर विकासाची संकल्पना सांगितली होती. त्यांच्याकडून सूचना, हरकती मागविल्या होत्या. पण पालकमंत्री केसरकर नव्याने विकास आराखडा तयार करत आहेत. आम्ही या मातीत जन्मलो आहे. येथील समस्या आम्हाला जास्त कळतात. विकास आराखडा कसा करत आहेत याची माहिती आम्हा आमदारांनाही दिली जात नाहीत. प्रशासनाकडे विचारणा केली तरीही माहिती दिली गेली नाही. त्यासाठी आता तिन्ही आमदारांना लेखी पत्र देण्याची वेळ आली आहे, असे आमदार पाटील म्हणाले.तीन कोटींचे अनुदान रद्दआमदार ऋतुराज पाटील यांनी केएमटीचे बस थांबे विकसित करण्याकरिता तीन कोटींचा निधी आणला होता. परंतु सरकार बदलल्याने हा निधी रद्द करण्यात आला. सरकारनेच रद्द केला असेल तर या गोष्टीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असेही पाटील यांनी सांगितले.

निधी आमचा, तोही देण्यास विलंबकेएमटीकडे नऊ वातानुकूलित बसेस घेण्यासाठी तीन कोटी १५ लाखांचा निधी आम्ही आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिला. ऑक्टोबर २०२२ मध्ये निधी दिल्याने या बसेस मे महिन्यापर्यंत येथील अशी अपेक्षा होती. परंतु हा निधी ट्रेझरीतून मिळत नव्हते. इतकी राज्य सरकारची परिस्थिती वाईट झाली. जो निधी आम्ही दिला तो देण्यासही विलंब लावला गेला, अशा शब्दात राज्य सरकारवर आमदार पाटील यांनी टीकास्त्र सोडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDipak Kesarkarदीपक केसरकर