शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘शिरोळ’च्या जागेवरही काँग्रेसचा दावा, जागावाटपात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:44 IST

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले अशा चार मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करत असून या ...

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले अशा चार मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करत असून या चार जागांसह आता शिरोळच्या जागेसाठीही काँग्रेसने आग्रह धरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. येत्या दोन दिवसांत काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असून त्यात कोल्हापुरातील उमेदवारांचा समावेश असेल, असे सांगण्यात येते.विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली आणि राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. कोल्हापुरातील जागांबाबत मुंबईत प्रदेश काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून चर्चा चर्चा, वाटाघाटी सुरू असून लवकरच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. विधानपरिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करत आहे.विद्यमान आमदारांपैकी करवीरमधून पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील, कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेमधून आमदार राजू आवळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कोल्हापूर उत्तरमधून आमदार जयश्री जाधव यांच्या उमेदवारीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांच्याऐवजी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या पर्यायी उमेदवारीचीही चाचपणी सुरू आहे. परंतु अद्याप तरी असा उमेदवार काँग्रेस समोर नाही.जिल्ह्यातील चार जागा या काँग्रेसला मिळणार हे जरी निश्चित असले तरी शिरोळच्या पाचव्या जागेवरही दावा करण्यात आला आहे. या जागेबाबत एक दोन दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार निवडणूक आणण्याची जबाबदारी आमदार सतेज पाटील व खासदार शाहू छत्रपती यांच्यावर राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसshirol-acशिरोळ