रंकाळा चौपाटीसह शाळांची मैदानेही बनली ओपन बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:24 IST2021-08-29T04:24:40+5:302021-08-29T04:24:40+5:30
मंगळवार पेठेतील एका शाळेच्या स्टेजवर रोज सकाळी आदल्या रात्री मद्यपींनी मद्य पिऊन बाटल्या तेथेच टाकलेल्या असतात. या बाटल्या शाळेच्या ...

रंकाळा चौपाटीसह शाळांची मैदानेही बनली ओपन बार
मंगळवार पेठेतील एका शाळेच्या स्टेजवर रोज सकाळी आदल्या रात्री मद्यपींनी मद्य पिऊन बाटल्या तेथेच टाकलेल्या असतात. या बाटल्या शाळेच्या शिपाई अथवा व्यायामासाठी येणाऱ्या खेळाडूंना रोज हटवाव्या लागत आहेत. यासह मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियमच्या पायऱ्यांवरही हाॅकीपटूंना सराव करण्यापूर्वी तेथे आदल्या रात्री मद्य पिऊन फोडण्यात आलेल्या बाटल्यांच्या काचा गोला कराव्या लागत आहेत. ही केवळ उदाहरण दाखल स्थळे आहेत. यासह शहरातील अनेक शाळांची मैदाने व अंधार असलेल्या जागांमध्ये मद्यपी रात्री खुला बार थाटत आहेत. याचा त्रास सकाळी फिरायला येणाऱ्यांना सातत्याने होत आहे. तरी चारही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अशा मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो : २८०८२०२१-कोल-हायस्कूल
आेळी : मंगळवार पेठेतील एका नामांकित शाळेच्या मैदानावरील स्टेजवर रोज अशा बाटल्यांचा खच पडत आहे.
फोटो : २८०८२०२१-कोल-रंकाळा चौपाटी
आेळी : रंकाळा तलाव परिसरातील खाद्य पदार्थांच्या गाड्यांमागे रात्री उशिरा मद्यपी दारू पिऊन अशा बाटल्या टाकून जात आहेत.
आेळी :