शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर नवरात्रौत्सव: पेड दर्शन ओके, पण व्हीआयपी नकोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:30 IST

अंबाबाईचा नवरात्रौत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या ज्या भाविकांना रांगेत थांबायचे नाही, त्यांच्यासाठी पेड ई पासची सोय करण्यात येणार आहे. या निर्णयाला काही जणांनी विरोध केला आहे. वास्तविक गर्दीचे व्यवस्थापन भाविकांच्या वेळेचे नियोजन यासाठी हे चांगले आहे. पण हे करताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने याकाळात व्हीआयपी दर्शनावर फुली मारण्याची गरज आहे. त्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य भक्तांना आणि समितीला होतो.अंबाबाईचा नवरात्रौत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. याकाळात २५ लाखांवर भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यातले २५ टक्के भाविक देवस्थान समितीच्या कार्यालयात येऊन येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हीआयपी दर्शनासाठी गळ घालत असतात. नेत्यांकडून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेली माणसं असतात, फोन जोडून देतात. त्यामुळे समितीला नकार देणंही जमत नाही. त्यामुळे मंदिराची कामे राहिली बाजूला अन् अर्ध्याच्यावर कर्मचारी या तथाकथिक व्हीआयपींना दर्शनासाठी नेण्या-आणण्यातच व्यस्त असतात. हाच प्रकार दुसरीकडे पोलिसांकडूनदेखील केला जातो. कारण शनि मंदिराकडील गेटची किल्ली त्यांच्याकडे असते.पेड ई पास सुरू केल्याने व्हीआयपी दर्शनासाठी लावला जाणारा तगादा कमी होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताणदेखील कमी होईल.

यंदा उच्चांकी गर्दीची शक्यता

एकीकडे तास दीड तास भाविक देवीच्या दर्शनासाठी रांगेत थांबून असतात. दुसरीकडे अशा आडव्या दाराने हे व्हीआयपी मध्येच घुसतात, याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य भाविकांना, व्यवस्थापनाला होतो. आता तीन वर्षांनी मोठ्या जल्लोषात अंबाबाईचा नवरात्रौत्सव होणार आहे, त्यात निर्बंधदेखील त्यामुळे होऊन जाऊ दे दर्शन म्हणून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून गर्दीचे नियोजन करावे लागणार आहे.

ताशी हजार व्यक्तीअनेक भाविकांना तासनतास रांगेत थांबणे शक्य नसते, पुढील प्रवास करायचा असतो. त्यांच्यासाठी पेड ई दर्शन पास सोयीस्कर असणार आहे. पासची किंमत सध्या तरी माणसी २०० रुपये ठरवली असून त्याचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. ई पासची दुकानदारी सुरू होऊ नये, यासाठी समितीचे काही कर्मचारीदेखील ऑन द स्पॉट बुकिंग करून देण्यासाठी बसवण्यात येणार आहे.

पेड दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रांग स्वतंत्र असणार आहे. त्याचा त्रास मोफत दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना होणार नाही. ही रांग गाडगे महाराज पुतळ्यापासून पूर्व दरवाज्यातून येईल आणि सटवाई मंदिरापासून भाविकांना आत सोडले जाईल. - शिवराज नाईकवाडे (सचिव. प. म. देवस्थान समिती)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर