सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:34+5:302021-06-01T04:18:34+5:30

दुकाने बंद असतानादेखील व्यापाऱ्यांना लाईट बिल, कर्जाचे हप्ते, घरफाळा, परवाना फी, टेलिफोन बिल, विम्याचे हप्ते, कामगारांचे पगार, शासनाचे सर्व ...

Allow all shops to open | सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या

सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या

दुकाने बंद असतानादेखील व्यापाऱ्यांना लाईट बिल, कर्जाचे हप्ते, घरफाळा, परवाना फी, टेलिफोन बिल, विम्याचे हप्ते, कामगारांचे पगार, शासनाचे सर्व कर भरावे लागत आहेत. ते वेळेवर न भरल्यास त्यावर दंड व व्याज लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. एप्रिल व मे महिन्यात गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, ईद, लग्नसराईचा हंगाम असल्याने सर्व माल दुकानात भरुन ठेवला होता. तो माल तसाच पडून आहे, त्याची बिलं द्यावी लागणार आहेत. सकाळी ७ ते ११ यावेळेत व्यवसाय करताना माल मिळत नाही, दुकानांत व बाजारात गर्दी होते. त्यामुळे सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वाढवून मिळावी त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही. अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, प्रदीपभाई कापडिया, अजित कोठारी, राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, संपत पाटील, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड उपस्थित होते.

---

फोटो नं ३१०५२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स

ओळ : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांना सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

---

--

Web Title: Allow all shops to open