आलइंस हाॅस्पिटलविरुध्द उपोषण करणार : मगदूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST2021-05-11T04:26:16+5:302021-05-11T04:26:16+5:30
इचलकरंजी येथील आलइंस हाॅस्पिटलमध्ये दाखल केलेला रुग्ण बेशुध्द असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने वेगवेगळे बिल लावून या रुग्णांच्या नातेवाईकांकडून वीस हजार ...

आलइंस हाॅस्पिटलविरुध्द उपोषण करणार : मगदूम
इचलकरंजी येथील आलइंस हाॅस्पिटलमध्ये दाखल केलेला रुग्ण बेशुध्द असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने वेगवेगळे बिल लावून या रुग्णांच्या नातेवाईकांकडून वीस हजार रुपयांची बिलाची आकारणी केली आहे. तसेच एचआरसीटीचे दर शासनाने जाहीर केले असतानाही त्यापेक्षा ज्यादा बिलांची आकारणी करून रुग्णांची लूट हाॅस्पिटलकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रुग्ण बेशुध्द असतानाही जेवणांचे बिल, पीपीई कीटचा वापर नसताना आठशे रुपये बिल अशी हजारो रुपयांची बिले जोडून रुग्णाची लूट हाॅस्पिटलकडून सुरू असून ही सर्व बिले घेऊन महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर व सिव्हिल सर्जन अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मुुख्याधिकारी इचलकरंजी नगरपालिका, प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्याकडे संबंधित हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी, याबाबत लेखी निवेदनासह सर्व पुरावे व बिल सादर करणार असल्याचे सांगितले.
हॉस्पिटलने ज्यादा बिले आकारणी करून सामान्य लोकांच्या सुरू केलेल्या पिळवणुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणार असून प्रशासनाने या हाॅस्पिटलवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या दालनासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम व सरपंच राजू मगदूम यांनी दिली.
चौकट
अलाइंस हाॅस्पिटलचे मुख्य शल्यविशारद बाळकृष्ण कित्तुरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी गायत्री डुबल यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.