शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सहकारी तत्त्वावर जोतिबासह २३ गावांचाही चौफेर विकास, प्राधिकरणची संकल्पना

By समीर देशपांडे | Updated: July 10, 2024 14:07 IST

आराखडा वास्तवात आणणे आव्हानात्मक

समीर देशपांडेकोल्हापूर: भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जोतिबा देवस्थानच्या महात्म्याच्या माध्यमातून जोतिबा डोंगर आणि परिसरातील २३ गावांच्या विकासाचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सहकारी तत्त्वावर जोतिबा प्राधिकरणाचा पूर्ण विकास अशीही यामध्ये संकल्पना असून, याव्दारे परिसरातील २३ गावांचा चौफेर विकास होईल, असे मनमोहक चित्र या आराखड्यातून तयार करण्यात आले आहे. व्यावसायिकदृष्ट्या जोतिबा ब्रॅण्डची निर्मिती हादेखील यातील एक घटक आहे.जोतिबा डोंगरावर वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे तेथील पायाभूत सोयी सुविधांवर सध्या ताण येत आहे. आपत्कालीन व्यवस्थेवरही हा ताण येत असून, यामुळे नागरिक, भाविकांना दर्जेदार सोयी, सुविधा देण्यावर मर्यादा येत आहेत. केवळ जोतिबा मंदिराचा विकास असा दृष्टिकोन न ठेवता डोंगरासह परिसरातील गावांना यामध्ये समाविष्ट केल्यास संपूर्ण पंचक्रोशी एकाच दिशेने विकास करेल, अशी यामागील संकल्पना आहे. म्हणून चार टप्प्यांमध्ये हा आराखडा मांडण्यात आला आहे. यामध्ये जोतिबा मंदिर परिसराच्या विकासकासह जुनी प्राचीन मंदिरे आणि घरांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट आहे.

हा आराखडा अंमलात आणल्यास डोंगर संवर्धन, पावसाच्या पाण्याचे व सांडपाण्याचे योग्य नियोजन, वाढत्या भूस्खलनावर नियंत्रण, जुने, प्राचीन जलस्रोत पुन्हा कार्यान्वित करणे, घनकचरा व प्रदूषणविरहीत व्यवस्था उभारणे, जोतिबा डोंगराची असलेली नाळ आणखी मजबूत करणे, पायाभूत सुविधांचा विकास, कृषी व पर्यटन विकास, नवीन रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास यासाठी मोठे काम होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्राधिकरण आवश्यक असून, सर्व शासकीय विभागांच्या मदतीने अंमलबजावणी करणे, यातून भाविकांना चांगल्या सुविधा देणे, यासाठीची सर्व प्रक्रिया शासनाच्या मदतीने हे प्राधिकरण करेल, असे नियोजन आहे.

पहिल्या टप्प्यातील गावेगिरोली, पोहाळे, दाणेवाडी, कुशिरे, केखले, जाखले, सादळे, मादळे, माले, केर्ली

दुसऱ्या टप्प्यातील गावेपन्हाळा, बुधवार पेठ, बहिरेवाडी, बोरपाडळे, पोखले, जाफळे

तिसऱ्या टप्प्यातील गावेकासारवाडी, शिये, वडणगे, निगवे दुमाला, भुये, मोहरे

विकासाचे मनोहारी चित्र

  • पोहाळे/ गुहा आणि परिसराचे सौंदर्यीकरण, अभयारण्य
  • कुशिरे/ लघु औद्योगिक वसाहत
  • केखले/दवणा प्रक्रिया उद्योग
  • माले/ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भेट माले गावी झाली होती. ते स्मृतीस्थळ उभारणे
  • केर्ली/दगडी कोरीव कामाला पाठबळ देणारी शिल्पशाळा, हुनरशाळा

उत्पन्नाचेही नियोजनवर्षभरामध्ये येणाऱ्या भाविकांपैकी पायी आणि शासकीय बसमधून येणारे भाविक वगळता दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहने, खासगी वाहनांनी येणाऱ्यांसाठी प्रवेश कर, वाहनतळ कर, भक्तनिवास भाडे, दुकानगाळे भाडे, खोबऱ्यापासून बनवला जाईल असा जोतिबा प्रसाद यातून वर्षाला १२ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गणित मांडण्यात आले आहे. जोतिबा माहिती दर्शक केंद्र, म्युझिकल फाउंडन शो, प्राणी संग्रहालय यातून साडे चार कोटी वर्षाला मिळतील, असेही कागदावर गणित मांडण्यात आले आहे.

हा केवळ आराखडाजोतिबा मंदिर आणि परिसरातील २३ गावांचा कशा पध्दतीने विकास करता येईल, याचा हा फक्त आराखडा आहे. हा कागदावर अतिशय उत्तम दिसत आहे. परंतु,हा वास्तवात आणणे आव्हानात्मक आहे. कारण या पध्दतीने विकास करताना सध्याच्या रचनेत, परिस्थितीत, यंत्रणेत मोठा बदल करावा लागणार आहे. तो ग्रामस्थ, भाविक या सर्वांना पचनी पडल्यानंतर मग अशा पध्दतीने प्राधिकरण कार्यरत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा