शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चा सर्वच टेम्पोधारकांना दम

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

दारू वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे बिल गोठवणार

कोल्हापूर : मद्याची वाहतूक करताना दुधाचा टेम्पो सापडल्याने ‘गोकुळ’ची संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आज, शुक्रवारी अध्यक्ष व संचालकांनी सर्वच ठेकेदारांना बोलावून दम दिला असून, असा प्रकार करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचा इशारा संघ व्यवस्थापनाने परिपत्रक काढून दिला आहे. कणेरीवाडी (ता. करवीर) येथे काल, गुरुवारी दुधाच्या टेम्पोतून विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला होता. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्णात खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी टेम्पोसह सुमारे नऊ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. यासंबंधी संदीप पाटील व अमित पाटील यांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल ‘गोकुळ’ प्रशासनाने घेतली असून, संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय आज संचालकांनी घेतला. त्याचबरोबर या ठेकेदाराचे बिल न देण्याचा निर्णयही संचालकांनी घेतला आहे. असे प्रकार पुढे होऊ नयेत, यासाठी सर्वच ठेकेदारांना बोलावून घेऊन त्यांना कडक शब्दांत सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईसह इतर ठिकाणी दूध वाहतूक करणाऱ्या टॅँकरांसह स्थानिक दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकांनाही याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात रोज हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)संबंधित ठेकेदाराचा ठेका आज रद्द केला आहे. त्याचबरोबर त्याचे वाहतुकीचे बिलही गोठविण्यात आले आहे. इतर ठेकेदारांनाही कडक शब्दांत सूचना देण्यात आल्या आहेत. - दिलीप पाटील (अध्यक्ष, गोकुळ)