शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

कनेक्शनसाठी सर्व पैसे भरतो म्हटले तरी ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:23 IST

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर ...

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर तीन वर्षांपासूनची कनेक्शन प्रलंबित आहेत. स्वखर्चाने कनेक्शन घेतो म्हटले तरी त्याला परवानगी देण्याचीही तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. या कारभारामुळे कोल्हापुरातील शेतकरी संतप्त झाले असून कनेक्शन मिळणार तरी कधी? असा सवाल करीत आहेत. मोर्चाद्वारे धडक देऊन झोपलेल्या यंत्रणेला जागे करण्याच्या मानसिकतेपर्यंत शेतकरी आले आहेत.पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषिपंपाद्वारे शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यासाठी वीज कनेक्शन अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणकडे या संदर्भात अर्ज करून प्रसंगी रक्कमही भरून ठेवली आहे. तथापि, कनेक्शनसाठी शासनाकडून लवकर परवानगी मिळत नाही, टी. सी. अपुरे आहेत, पोलच उपलब्ध नाहीत, सर्व्हिस वायर नाहीत, फ्युज कमी प्रमाणात आहेत, अशी अनेककारणे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांना थातुरमातुर उत्तरे दिली जात आहेत.ताराबाई पार्कातील कार्यालयात फाईल पडूनएकेका वीज कनेक्शनसाठी किमान लाख, दीड लाखाचा खर्च येतो. शासनाकडून निधी येत नसल्याने लवकर कनेक्शन देता येत नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात; पण हेच अधिकारी मात्र कनेक्शनसाठी लागणारा तीन-चार लाखांचा सर्व खर्च स्वत: करण्यास तयार असणाºया शेतकºयांनाही परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ‘करवीर’मधील एका शेतकºयाने मागितलेल्या परवानगीचा अर्ज ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयात पडून आहे.कायदा काय सांगतोवीज कायदा २००३ चे कलम ४३ नुसार वीजपुरवठा संहिता २००५, ३ नुसार विहीत मुदतीत वीज कनेक्शन देणे महावितरणवर बंधनकारक आहे. असे असूनही साधनसामग्री नाही असे सांगून कनेक्शन देण्यास टाळाटाळ होत आहे. कनेक्शनचा खर्च स्वत: केला तर त्याची भरपाई वीज बिलातून होणे अपेक्षित असताना परत त्याचा बोजा शेतकºयांवरच टाकला जात आहे.मी भागाने शेती करतो, महावितरणकडे कनेक्शनसाठी अर्ज करूनच घ्यावा असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. दोन एकर शेती व पाच एचएपीच्या मोटरपंपासाठी चार लाखांचा टीसी बसवणे आवाक्यापलीकडचे असल्याने नकार दिला. माझ्या शेताच्या १२० फुटांवर थ्री फेजची विद्युतवाहिनी असतानाही तेथून कनेक्शन देण्याऐवजी स्वतंत्र टी.सी.ची अट घालून चार महिन्यांपासून अडवणूक सुुरू आहे. ताराबाई पार्कातील कार्यालयात अधिकाºयांची भेट घेतली तर ते दाद लागू देत नाहीत.- भानुदास माने, शेतकरी, शिरोळ