शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 08:45 IST

सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीसह सर्व उद्योग, कारखाने येत्या रविवारपासून पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उद्योजकीय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी दिली.सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार, १५ मे ते रविवार, २३ मेपर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याबाबतची भूमिका उद्योजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जाहीर केली. शनिवारी मध्यरात्रीपासून २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने वगळता अन्य उद्योग, कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.

सुमारे ८०० कोटींची उलाढाल ठप्प होणारशिरोली, गोकुळ शिरगाव, कागल- हातकणंगले औद्योगिक वसाहतींमध्ये दरमहा ७० हजार टन कास्टिंग्जचे उत्पादन होते, तर सरासरी ६०० कोटींची उलाढाल होते. फौंड्री बंद राहिल्याने सुमारे २२५ कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याचे आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले आणि स्मॅॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले. फौंड्रीसह अन्य उद्योग, कारखाने बंद राहणार असल्याने सुमारे ८०० कोटींची उलाढाल ठप्प होईल, असे ‘मॅॅक’चे अध्यक्ष गोरख माळी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूर