कोल्हापूरात उद्यापासून लॉकडाउन, बँकांसह 'या' गोष्टी राहणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 07:14 PM2020-07-19T19:14:27+5:302020-07-19T19:27:15+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून पासून सात दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

All banks will continue to have head offices | कोल्हापूरात उद्यापासून लॉकडाउन, बँकांसह 'या' गोष्टी राहणार सुरु

कोल्हापूरात उद्यापासून लॉकडाउन, बँकांसह 'या' गोष्टी राहणार सुरु

Next
ठळक मुद्देउद्योगांमधील कर्मचारी क्षमता 50 टक्के; दुधसंकलन व वाहतुकीस वेळ मर्यादा नाहीजिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांचे सुधारित आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यात उद्यापासून पासून सात दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

त्या बरोबर दूध संकलन व वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा असणार नाही. या बाबतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला आहे.

जिल्हादंडाधिकारी यांनी आज जाहीर केलेल्या सुधारित आदेशानुसार सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील तसेच बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सीची कामे सुरु राहतील.

दुध संकलन व वाहतूक सुरु राहील (वेळेची मर्यादा नाही) आणि ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खाजगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.






 












 

 

Web Title: All banks will continue to have head offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.