शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

बनावट नोटाप्रकरणी आलासच्या तरुणास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:27 IST

Court Kolhapur : बनावट नोटा निर्मिती व जवळ बाळगल्याप्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून अटक केलेल्या आरोपीस चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. कागलकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विश्वास अण्णाप्पा कोळी (वय २७, रा. आलास, ता. शिरोळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्दे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल दुसरा आरोपी निर्दोष; तीन वर्षांनंतर निकाल

कोल्हापूर : बनावट नोटा निर्मिती व जवळ बाळगल्याप्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून अटक केलेल्या आरोपीस चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. कागलकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विश्वास अण्णाप्पा कोळी (वय २७, रा. आलास, ता. शिरोळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दुसरा संशयित आरोपी जमीर अब्दुलकादर पटेल (वय ३२, रा. आलास) याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील पी. जे. जाधव यांनी काम पाहिले.खटल्याची पार्श्वभूमी अशी : विश्वास कोळी व जमीर पटेल यांना गांधीनगरमध्ये वळीवडे रेल्वेस्टेशन स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दि. १९ मार्च २०१८ रोजी रात्री छापा टाकून पकडले. त्यांच्याकडे १००, २०० व २००० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. चौकशीत कोळी याने या सर्व बनावट नोटा आलास (ता. शिरोळ) येथे आपल्या राहत्या घरी कलर झेरॉक्स प्रिंटरवर छापल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कलर झेरॉक्स प्रिंटर, कागदाची रिम, कात्री, बनावट नोटा असे साहित्य जप्त केले होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस हे. कॉ. विजय कारंडे यांनी फिर्याद दिली होती. तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. तानाजी सावंत व तत्कालीन पो.नि. दिनकर मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.सुनावणीत सहा. सरकारी वकिलांनी १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जप्त मुद्देमालाचा मुंबई व नाशिकहून आलेला तपासणी अहवाल, पंच तसेच तपासी अधिकाऱ्र्यांच्या साक्ष, सरकारी वकिलांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. त्यानुसार विश्वास कोळी याला पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दुसरा आरोपी जमीर पटेल याची निर्दोष मुक्तता केली. याकामी सहा. उपनिरीक्षक एम. एम. नाईक, हे, कॉ. आनंदा शिंदे (गांधीनगर) किरण गावडे(एलसीबी) यांचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर