आजरा माध्यमिक पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:11+5:302021-03-24T04:22:11+5:30
अध्यक्ष गजानन चिगरे यांनी सभासदांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अभिजित देसाई यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. प्रास्ताविकात अध्यक्ष चिगरे यांनी संस्थेच्या ...

आजरा माध्यमिक पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन
अध्यक्ष गजानन चिगरे यांनी सभासदांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अभिजित देसाई यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. प्रास्ताविकात अध्यक्ष चिगरे यांनी संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीचा आलेख सादर केला. सचिव बशीर मुल्ला यांनी मागील सर्वसाधारण वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन, आर्थिक पत्रकांचे वाचन केले.
कोरोना महामारीच्या काळात आर्थिक व्यवहार कोलमडले असतानाही, योग्य नियोजन करत संस्था स्थैर्य ठेवल्याबद्दल व आर्थिक वर्षात सभासदाभिमुख कारभार केल्याबद्दल निंगुडगे हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव देसाई यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
यावेळी चर्चेत विष्णुपंत यमगेकर, शिवदास मुंडे, सदानंद चव्हाण, शंकर चव्हाण, नंदकुमार राजगोळकर, मधुकर चोथे यांनी भाग घेतला. सभेत सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध करावी, एसएमएस सेवा द्यावी, कर्ज व्याजदर कमी करावेत, अशा सूचना करण्यात आल्या.
सभेस संचालक संजीव देसाई, शिवाजी तांबेकर, शरद पाटील, ईश्वर शिवणे, चंद्रकांत पाटील, अस्मिता पुंडपळ, उमाराणी जाधव, कर्मचारी पंकज देसाई, मोहन डोणकर उपस्थित होते.
संचालक रवींद्र पाटील यांनी आभार मानले.