शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

तुतारी विरुद्ध मुतारीच्या पोस्टने अजित पवारांना धुतले, सोशल मीडियावर धुमाकूळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 11:35 IST

कोल्हापूर : एखादे विधान किती महागात पडू शकते, याचा अनुभव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याइतका दुसरा कोणाला आला नसेल. ...

कोल्हापूर : एखादे विधान किती महागात पडू शकते, याचा अनुभव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याइतका दुसरा कोणाला आला नसेल. आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या अजित पवार यांनी उजनी धरणाच्या पाण्यावरून केलेल्या विधानाचा संदर्भ देत प्रत्येक ठिकाणी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो. आतातर चक्क त्यांच्या कधीकाळच्या स्वकियांकडूनच धरणातील पाण्यावरून त्यांना खिंडीत गाठले जात आहे. शरद पवार यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला गुरूवारी निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले. शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काही मिनिटांच्या आतच सोशल मीडियावर तुतारीतून रणशिंग फुंकले. मात्र, ‘आता तुतारी विरुद्ध मुतारी’ अशी नवी टॅगलाइनही चालवत अजित पवार गटाला चांगलेच डिवचले. सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफाॅर्मवर ही टॅगलाइन दोन दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. याला उत्तर देताना अजित पवार गटाची पुरती दमछाक झाली असली, तरी ‘विचार विखारी, मिळाली तुतारी’ असे म्हणत त्यांनीही शरदचंद्र पवार गटाच्या वैचारिक मर्मावर बोट ठेवले आहे. शरद पवार गटाला चिन्ह तुतारी. आता काका आणि दादा यांच्यात लढाई ‘तुतारी विरुद्ध मुतारी’ अशा पोस्टनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे काका-पुतणे गटाच्या वादात उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसचे कार्यकर्तेही ‘हीच ती वेळ आहे ‘हाता’त क्रांतीची पेटती ‘मशाल’ घेऊन विजयाची ‘तुतारी’ वाजवायची,’ अशा पोस्टमधून हात धुवून घेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocial Viralसोशल व्हायरल