शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

विधानसभेचे पडघम: ‘आजरा कारखाना' निकालाने राष्ट्रवादीला पाठबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:31 IST

घाटगे, आबिटकर, शिवाजी पाटील यांना करावे लागणार परिश्रम

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यातील राष्ट्रवादीच्या एकतर्फी विजयामुळे विधानसभेसाठी पुन्हा रिंगणात उतरणारे आ. प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे आणि चंदगडचे शिवाजीराव पाटील यांना विधानसभेसाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. कारखान्याचे सभासद आणि विधानसभेचे मतदार यांच्यात मोठा फरक असला तरी यानिमित्ताने आजरा तालुक्यात ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने आपली मूठ आवळली आहे. ती भेदण्यासाठी या तिघांना अधिक परिश्रम करावे लागणार हे निश्चित.आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मैदान मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी मारले. त्यांना बिद्रीच्या विजयामुळे प्रचंड आत्मविश्वास आलेल्या के. पी. पाटील आणि विद्यमान आमदार असलेल्या राजेश पाटील यांनी ताकदीने पाठबळ दिले. या तिघांनीही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले.या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या चराटी, शिंपी, शिंत्रे, रेडेकर आघाडीसोबत समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर, शिवाजीराव पाटील निवडक ठिकाणी दिसले. हे तिघेही पराभूत आघाडीच्या प्रचारासाठी जंगजंग पछाडताना दिसले नाहीत. त्यामुळेच ही आघाडी फरकाने पराभूत झाल्यानंतर या तिघांनाही आजरा तालुक्यातील आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा कागल विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांनी मोठी ताकद येथे लावली. परिणामी सत्तेवर आलेल्या रवळनाथ आघाडीला ६५० चे मताधिक्य याच गटातून मिळाले. जे तालुक्यातील अन्य चार गटांतून कुठेच तुटू शकले नाही. त्यामुळे तुलनेत या ठिकाणी राष्ट्रवादी मजबूत असल्यावर शिक्कामाेर्तब झाले आहे.आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ हा आबिटकर यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो. यामध्ये पश्चिम भागातील गावांचा समावेश आहे. या गावातून चराटी यांच्या आघाडीला पाठबळ मिळाले असले तरी फरक फारसा नव्हता. त्यामुळे के. पी. पाटील यांना येथून ताकद मिळू शकते. हीच परिस्थिती कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. या ठिकाणी आ. राजेश पाटील यांनी सत्तारूढच्या प्रचारात अधिवेशन असूनही हिरीरीने भाग घेतला होता. या ठिकाणाहून इच्छुक असलेले भाजपचे शिवाजी पाटील यांनाही या परिसरात अधिक राबणूक करावी लागेल.अजून दहा महिन्यांचा कालावधीविधानसभेची निवडणूक अजून १० महिन्यांवर आहे. वरील तिनही मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात लढू इच्छिणारे नेते हे सध्या महायुतीमध्ये बांधले गेले आहेत. परंतु एकदा का लोकसभा पार पडली की, विधानसभेवेळचे जागा वाटप कसे असेल हे अजूनही कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. त्यामुळे उर्वरित दहा महिन्यांत जोशात असलेल्या राष्ट्रवादीविरोधात हे तीनही नेते कशा पद्धतीने व्यूव्हरचना आखणार आहेत, हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेस