शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी आमदार नव्हे, तर खासदार व्हावे लागते; उदय सामंतांचा सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 12:38 IST

कोल्हापूर : येथील विमानतळ अतिशय उत्तम आणि आकर्षक झाले आहे. कोणीही काही म्हणो मात्र विमानतळाच्या विकासाच्या कामासाठी आमदार नव्हे, ...

कोल्हापूर: येथील विमानतळ अतिशय उत्तम आणि आकर्षक झाले आहे. कोणीही काही म्हणो मात्र विमानतळाच्या विकासाच्या कामासाठी आमदार नव्हे, तर खासदार व्हावे लागते, असा उपरोधिक टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. महायुतीच्यावतीने आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, वीरेंद्र मंडलिक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते. महाराष्ट्रात नव्हे, तर भारतात इंडियाचे ३५ खासदार असतील, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.सामंत म्हणाले, कोल्हापूरच्या विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारने २७४ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून विमानतळाचे आधुनिकीकरण झाले. एवढा निधी आमदार फंडातून येत नाही. त्याला खासदार व्हावे लागते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून आतापर्यंत ३४ हजार उद्योजक तयार झाले असून, त्यातून सुमारे एक लाखाहून अधिक रोजगार निर्माण झाला आहे. म्हसवड येथे तीन हजार एकरमध्ये कॉरिडॉर निर्माण केला असून, उद्योजकांसाठी महावितरणला साडेआठ हजार कोटी रुपये वितरित केले आहेत.औद्योगिक वसाहतीतील दादागिरी रोखण्यासाठी उद्योजकांनी धाडस दाखविल्यास त्यांना पोलिस संरक्षण दिले जाईल. या लोकशाहीच्या उत्सवात उद्योजकांनी सकारात्मक राहून मतदान करावे. यावेळी अजय सप्रे, सारंग जाधव, बाबासाहेब कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, दीपक चोरगे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरिश्चंद्र धोत्रे यांनी प्रास्ताविक केले. विज्ञान मुंढे यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळUday Samantउदय सामंतSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील