शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

‘विमानतळा’चे अडथळे महिन्यात होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:54 AM

विमानतळ परिसरातील तामगाव, हुपरी रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तामगाव रस्त्याबाबत पर्याय दृष्टिक्षेपात असून उद्या पाहणीनंतर निर्णय होईल. हुपरी रस्त्याला उपरस्ता करण्यासाठी प्राधिकरणच्या तज्ज्ञांकडून पाहणी करूनच निर्णय होईल.

ठळक मुद्देदर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेणार । सतेज पाटील जिल्हाधिकारी । विमानतळ विकासकामांसंदर्भात बैठक ।

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे हे महिन्याभरात दूर केले जातील. प्रशासन पातळीवरील कामे महिन्यात, तर शासनपातळीवर निधीसाठी प्रस्तावित असलेली कामे निधी प्राप्त झाल्यानंतर सुरू केली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. तर विमानतळासंदर्भातील अडचणी व तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेतली जाईल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. दरम्यान उद्या, सोमवारी विमानतळ येथे संयुक्त पाहणी करण्याबाबतही यावेळी ठरले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह विमानतळ प्राधिकरणचे महाप्रबंधक (सिव्हील विभाग) सतीश गुप्ता, उपमहाप्रबंधक अनंत शेखर, वरिष्ठ प्रबंधक पूजा मूल, ए. एम. वेणू, प्राधिकरणचे सल्लागार समिती सदस्य तेज घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल भामरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर म्हारुळकर, एस. एल. शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले, राजू माने, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन जिल्हाधिकारी, विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करावी, असे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवत संयुक्त पाहणी करण्याचे ठरले. विमानतळासंदर्भातील काही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. अजून नवीन जमीन संपादनाचे विषय आहेत. सध्या टर्मिनल इमारतीचे सुरू असलेले काम, तसेच कामे कोणत्या पातळीवर सुरू असून कुठे थांबली आहेत याचा आढावा घेतला जाईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणासाठी येथील मंदिर स्थलांतर करण्याची प्रक्रिया स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांच्याशी चर्चा करून पंधरा दिवसांत करण्यात येईल. महावितरणकडे आॅप्टिकल लाईटस् लावण्याचा १४ लाखांचा प्रस्ताव असून, त्याचे पैसे त्यांच्याकडे जमा केले आहेत. त्यानुसार महावितरणने पंधरा दिवसांत या लाईटस् लावण्याचे मान्य केले. विस्तारीकरणासाठी आणखी ६४ एकर अतिरिक्त जमीन संपादनाचा प्रस्ताव असून, त्याचा सर्व्हे व मार्किंग करून अंतिम प्रस्ताव प्राधिकरणकडे पाठविला जाईल. विमानतळ परिसरातील तामगाव, हुपरी रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तामगाव रस्त्याबाबत पर्याय दृष्टिक्षेपात असून उद्या पाहणीनंतर निर्णय होईल. हुपरी रस्त्याला उपरस्ता करण्यासाठी प्राधिकरणच्या तज्ज्ञांकडून पाहणी करूनच निर्णय होईल.

डिसेंबरअखेर दिशादर्शक फलक लागणारविमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलक केव्हा लागणार? अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी सार्वजनिक बांधकामचे भोसले यांना केली. यावर टेंडर प्रक्रियाझाली असून, जानेवारीअखेर फलक लावले जातील, असे त्यांनी सांगितले. पैसे मंजूर असतील तर इतका उशीर का? अशी विचारणा पाटील यांनी केल्यावर डिसेंबरअखेर हे फलक लावू, असे आश्वासन भोसले यांनी दिले.

विमानतळासाठी गुरुवारपासून ‘केएमटी’विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुरुवार (दि. २१)पासून केएमटी बस सुरू करण्यात येणार आहे. ही बस कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले. त्याचबरोबर विमानतळाकडे जाणाºया रस्त्यांवर असणारा कचरा उठाव करण्यासाठी उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडून ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

विजेचे खांब, वाहिन्या, झाडे यांचे अडथळेविजेचे खांब, वीजवाहिन्या यांचे अडथळे दूर करण्याबरोबरच झाडांचे अडथळे दूर करण्याला प्राधान्य देण्याबरोबरच परिसरातील इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांचे अडथळे काढण्यासाठी त्यांना पत्र दिले जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील