कोल्हापूर : कोल्हापूरच्या विस्तारित हवाई सेवेमुळे येथील औद्योगिक, व्यावसायिक, पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास ‘लोकमत एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी रविवारी येथे व्यक्त केला.कोल्हापूरच्या हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये रविवारी आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या हवाई मार्गाबरोबर दिवसातून दोन वेळा इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा रविवारपासून सुरू झाली. या विमानसेवेचा शुभारंभानंतरच्या पहिल्या विमानातून पहिले प्रवासी म्हणून कोल्हापूर विमानतळावर डॉ. विजय दर्डा यांचे गुलाबपुष्प देऊन खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत केले.यावेळी विजय दर्डा आणि खासदार महाडिक यांच्यात विविध विषंयावर चर्चा झाली. खासदार महाडिक यांनी उडाण योजनेतून कोल्हापूरचे हवाई क्षेत्र विस्तारत चालल्याचे सांगितले. यावेळी कोल्हापूर विमानतळावरील अधिकारी अनिल श्रीवास्तव, राजेश अहिरवार, बेनू नायक, अंकित व्यास, रविराज लामकाने, राजेश पेडणेकर यांच्यासह इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते.
Web Summary : Kolhapur's expanded air service will boost industry, business, and tourism, said Dr. Vijay Darda. Indigo Airlines launched twice-daily Kolhapur-Navi Mumbai flights. MP Dhananjay Mahadik welcomed Darda, the first passenger. They discussed the expansion of Kolhapur's air sector under the UDAN scheme.
Web Summary : डॉ. विजय दर्डा ने कहा कि कोल्हापुर की विस्तारित हवाई सेवा उद्योग, व्यवसाय और पर्यटन को बढ़ावा देगी। इंडिगो एयरलाइंस ने दिन में दो बार कोल्हापुर-नवी मुंबई उड़ानें शुरू कीं। सांसद धनंजय महाडिक ने पहले यात्री दर्डा का स्वागत किया। उन्होंने उड़ान योजना के तहत कोल्हापुर के हवाई क्षेत्र के विस्तार पर चर्चा की।