शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा जिल्ह्यात कार्यशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा केवळ पाट्या न टाकता, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा केवळ पाट्या न टाकता, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय, या भावनेतून जिल्ह्यात काम करीत आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी काढले.

इंडो काऊंट फौंडेशनच्या सहकार्याने ‘सीपीआर’मधील जिल्हा एड‌्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी फौंडेशनच्या वतीने समितीला १२ संगणक आणि १२ फ्रिज देण्यात आले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, या कार्यालयाची यंत्रणा स्वत: झोकून देऊन काम करीत असते. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून फौंडेशनही काम करीत आहे. आरोग्य विभागाने जिल्हाभर एखादी मोठी मोहीम फौंडेशनच्या माध्यमातून राबवावी.

फौंडेशनचे संचालक कमल मित्रा म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाची प्रेरणा घेऊन कार्डियाक विभागातील महिला विभागाचे आणि या कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. कोल्हापूरमधूनच आम्ही मोठे झालो आहोत. या शहराच्या विकासात हातभार लावताना मला निश्चितच आनंद होत आहे.

यानंतर झालेल्या समितीच्या बैठकीत, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत कोरोना काळात महिन्याला पाच हजार याप्रमाणे ३१२ सेक्स वर्कर महिलांना व त्यांच्या शाळेत जाणाऱ्या १२ मुलांना महिना अडीच हजार रुपये अशी मदत देण्यात आली. त्याबाबत जिल्हाधिकारी आणि समितीचे विशेष आभार मानण्यात आले.

जिल्हा कार्यक्रमाधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. विलास देशमुख डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. जी. काटकर उपस्थित होते.

---

फोटो नं २१०१२०२१-कोल-एडस नियंत्रण समिती

ओळ : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामधील जिल्हा एड‌्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी व इंडो काऊंट फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

--