शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील वारसांना सव्वा कोटींची मदत, कोल्हापूर जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:35 IST

वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : अभयारण्ये किंवा जंगलाच्या क्षेत्रातील मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. या प्रकारामुळे कोल्हापूर वनविभागात २०१९ ते २०२२ अखेर या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना आतापर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.काेल्हापूर वनविभागात वर्ष २०१९ मध्ये एकूण चौघांचा मृत्यू झाला, प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ६० लाख, २०२० मध्ये एक, २०२२ मध्ये एकाचा मृत्यू होऊन त्यांना प्रत्येकी १५ लाखांची भरपाई देण्यात आली आहे. अलीकडेच डिसेंबर २०२२ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना २० लाखांची रक्कम कोल्हापूर वनविभागामार्फत दिली आहे. नव्या तरतुदीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात आलेली ही पहिलीच रक्कम आहे.या तीन वर्षात झालेल्या हल्ल्यांमध्ये गव्यांच्या हल्ल्यातील मृतांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५ इतकी आहे. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूला तीन गवे रेडे कारणीभूत आहेत. २०१९ मध्ये या तीन गव्या रेड्यांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ २०२० मध्ये शिरोळ तालुक्यात नदीकाठावर मगरीच्या हल्ल्यात एकाचा, तर २०२१ मध्ये दानवाडजवळ एकाचा मृत्यू झाला आहे.२०२१-२२ मध्ये दोन गव्यांच्या हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये शाहूवाडी तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मुलगी ठार झाली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात १, त्यापाठोपाठ रानगवा आणि मगरीच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाली आहे. या हल्ल्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची फारशी माहिती नाही. पण, बहुतांश मृत्यू जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांचे आणि शेतात काम करणाऱ्या महिला, पुरुषांचे आहेत. शिरोळ तालुक्यातील पाणवठे आणि नद्यांमध्ये असलेल्या मगरींमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे यात दिसते.

या कोल्हापूर प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीतील घटना आहेत. वन्यजीव विभागाची हद्द संरक्षित वनक्षेत्रात येत असल्यामुळे तेथील हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई दिली जात नाही. पूर्वीच्या तुलनेत नुकसानभरपाईच्या मदतीत ५ लाखांनी वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये दिलेली वाढीव रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच आहे. - जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक, कोल्हापूर, वनविभाग.

वर्ष  मनुष्य मृत्यू अनुदान  मृत्यूचे कारण
२०१९  ६० लाख  ३ गवा रेडे, १ मगर
२०२०   १  १५ लाख  १ मगर
२०२१   १  १५ लाख    १ गवा
२०२२  २   ३५ लाख १ गवा, १ बिबट्या

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या