अहमदनगर, पुणे विजयी
By Admin | Updated: February 13, 2015 22:53 IST2015-02-13T22:26:11+5:302015-02-13T22:53:45+5:30
जयंत चषक फुटबॉल स्पर्धा: झारखंड संघ पुढील फेरीत

अहमदनगर, पुणे विजयी
मिरज : मिरजेत शिवाजी क्रिडांगणावर जयंत चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अहमदनगर आर्मी संघ, डीएसके शिवाजीयन्स पुणे व झारखंड संघाने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविले. विद्युत झोतात सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेस प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती.
अहमदनगर आर्मी विरूध्द अहमदाबाद (गुजरात) यांच्यातील सामना एकतर्फी झाला. अहमदनगर आर्मी संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत पर्वार्धात एक व उत्तरार्धात दोन गोल नोंदवीले. हा सामना अहमदनगर संघाने ३-० असा जिंकला.
डीएसके शिवाजीयन्स पुणे विरूध्द रोव्हर्स क्लब औरंगाबाद यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पुर्वर्धात दोन्ही संघ गोल-शुन्य बरोबरीत होते. मात्र उत्तरार्धात शिवाजीयन्स संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत औरंगाबाद संघाचा बचाव उध्दवस्त केला. हा सामना शिवाजीयन्स संघाने २-० असा जिंकला. झारखंड फुटबॉल क्लब विरूध्द मिरजेतील न्यु स्टार संघा दरम्यान झालेल्या सामन्यात झारखंड संघाने दोन गोलने विजय मिळविला. यजमान सांगली विरूध्द हुबळी यांच्यातील सामना अतीतटीचा झाला.
पूर्वार्धात दोन्ही संघ गोल-शुन्य बरोबरीत होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले. मैनुद्दीन बागवान, जमिल बागवान, विजय सुर्यवंशी, वसंत अग्रवाल, अतिष अग्रवाल, जग्गू सय्यद उपस्थित होते. (प्रतिनिधी)