शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी

By भारत चव्हाण | Updated: November 7, 2025 17:37 IST

भाजप ३३ जागांवर आग्रही, महाविकास आघाडीत अद्याप शांतताच

भारत चव्हाणकोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीतील घटक पक्षात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. नव्या सभागृहात आपलाच महापौर करण्याबरोबरच नगरसेवकांची संख्याही सर्वाधिक आपलीच असावी यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्या माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याची महायुतीत चढाओढ सुरू आहे.महायुतीच्या नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या याबाबतच संभ्रम आहे. काही नेते एकत्रित लढण्याचे सांगत आहेत, दुसरीकडे स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली जात आहे. अशीच परिस्थिती कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र तयारी करत आहेत. एवढेच नाही तर जागांवर देखील दावे करू लागले आहेत. जास्त जागा मागणीसाठी नेते मंडळी सरसावली आहेत.जागावाटपाचा विषय अजून लांब असला तरी आतापासूनच महायुतीत चढाओढ सुरू झाली आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्याची सुरुवात झाली आहे. शिंदे सेनेने यात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी व भाजपही काही मागे नाही. शिंदे सेनेने सुरुवातीला काँग्रेसमधील पंधराहून अधिक नाराज माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतले. भाजपने राष्ट्रवादी व काँग्रेसचे माजी नगरसेवक घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिंदेसेना व भाजपचे माजी नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत.

भाजप ३३ जागांवर आग्रहीभाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी पूर्वीच्या सभागृहातील ३३ जागांवर आपलाच हक्क असल्याने त्या तर मिळाल्यास पाहिजेत, असा आग्रह धरला आहे.

शिंदेसेनेची आक्रमक तयारीशिंदे सेनेने माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांची आक्रमकपणे जुळवाजुळव केली आहे. आजच्या घडीला शिंदेसेनेने जवळपास ३० पेक्षा अधिक माजी नगरसेवकांची यादी तयार केली आहे.राष्ट्रवादीचा शिंदेसेना, भाजपला धक्काराष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिंदेसेना, भाजपला धक्का देण्याचे तंत्र अवलंबले असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच त्यांचे पाच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत घेतले असून अजूनही काही जण येणार असल्याचा दावा केला जात आहे.

महाविकास आघाडीत शांततामहायुतीत जोरदार तयार सुरू असताना महाविकास आघाडीत मात्री अद्यापही शांतता आहे. काँग्रेस वगळता उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बैठकाही झालेल्या नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Mahayuti factions vie for 'electable' candidates before municipal elections.

Web Summary : Kolhapur's Mahayuti alliance partners compete fiercely for strong candidates before municipal polls. Shinde's Sena leads in attracting former corporators, followed by BJP and NCP. Seat sharing is undecided, but aggressive recruitment is underway. MVA remains quiet.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Corporationनगर पालिकाMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकMahayutiमहायुतीPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी