शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

रोजगार निर्मितीसह शेतीची पुनर्रचना गरजेची : भालचंद्र मुणगेकर--‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ या विषयावर कोल्हापूर येथे विवेचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:09 AM

कोल्हापूर : सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षण क्षेत्राचेही खासगीकरण सुरू आहे. कायमस्वरूपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे.

ठळक मुद्देडॉ. मुणगेकर म्हणाले,फळांवर प्रक्रिया करणे गरजेचेशिक्षणाचे खासगीकरण धोकादायककायमस्वरूपी रोजगार हमी पाहिजे महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे

कोल्हापूर : सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षण क्षेत्राचेही खासगीकरण सुरू आहे. कायमस्वरूपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटाबंदी निर्णय, जीएसटीची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पुनर्रचना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेत ‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते.

डॉ. मुणगेकर म्हणाले, गेल्या दहा वर्षांचा विचार करता गेल्या चार वर्षांत विकास दर कमी झाला आहे. त्याचे एक कारण म्हणजे नोटाबंदी होय. नोटाबंदीमुळे भारतामधील अर्थव्यवस्था सहा ते सात महिने ठप्प झाली. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटांना आळा घालणे आणि अतिरेकी कारवाई रोखणे या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यापैकी कोणते एकहीकारण या निर्णयामुळे साध्य झाले नाही. जीएसटी हा सर्वांत चांगला निर्णय आहे; मात्र, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली गेली नाही.

गेल्या तीन-चार वर्षांत रोजगाराची चर्चा केली जात नाही. मोठ्या रोजगारांमुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. मात्र, रोजगार निर्मिती होत नाही. लहान-लहान उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्याला उभारी देणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाºयांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. डी. चव्हाण यांनी आभार, तर प्रा. तेजस्विनी मुडेकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पोवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश हिलगे, उपाध्यक्ष अशोक पर्वते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘गुजरात’ची कॉलनी बनेल...मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. ही ट्रेन फक्त गुजरातमधील व्यापाºयांच्या सोयीसाठी असेल. ती जर सुरू झाली तर महाराष्ट्र गुजरातमधील एक कॉलनी होऊन बसेल. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काहीच बोलत नाहीत, असेही मुणगेकर म्हणाले.कोल्हापुरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी ताराराणी विद्यापीठ आयोजित क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मार्गदर्शन केले. शेजारी एस. आर. पर्वते, प्राजक्त पाटील, डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. एस. एन. पवार, अ‍ॅड. प्रकाश हिलगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर