हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, दलालांचे :चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 19:14 IST2020-12-08T19:13:06+5:302020-12-08T19:14:29+5:30

chandrakant patil, kolhapur केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत. पंजाबमध्ये बाजार समित्यांचा आठ टक्के कर बुडत असल्याने हे आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही तर दलालांचे, ज्यांचे कमिशन बुडते त्यांचे आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली

This agitation is not of farmers, it is of brokers: Chandrakant Patil's allegation | हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, दलालांचे :चंद्रकांत पाटील यांचा आरोप

हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, दलालांचे :चंद्रकांत पाटील यांचा आरोप

ठळक मुद्दे हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, दलालांचेचंद्रकांत पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत. पंजाबमध्ये बाजार समित्यांचा आठ टक्के कर बुडत असल्याने हे आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही तर दलालांचे, ज्यांचे कमिशन बुडते त्यांचे आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ आयोजित पत्रकार परिषदेत पाटील मंगळवारी बोलत होते. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

पाटील म्हणाले, मी पणनमंत्री असताना २०१७ साली कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन मुक्तीचा कायदा आणला होता. तेव्हाही १५ दिवस समित्या बंद राहिल्या; पण सरकार हटले नाही. शेतकऱ्यांना त्यामुळे कुठेही माल विकण्याची मुभा मिळाली. म्हणून बाजार समितीचे उत्पन्न एकदमच बंद झाले असे होत नाही. ती व्यवस्थाही नव्या कायद्यात कायम ठेवण्यात आली आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.

भारतातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. पंजाबमधूनच हे आंदोलन उभारले; कारण तेथे बाजार समित्यांचा आठ टक्के कर या कायद्यामुळे बुडणार आहे; पण शेतकऱ्यांना कुठेही दर मिळेल तेथे माल विक्री करण्यासाठी परवानगी दिली तर त्यात काय अडचण आहे?

 

Web Title: This agitation is not of farmers, it is of brokers: Chandrakant Patil's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.