शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गुप्तधन अमिषापोटी नरबळी देण्याचा अघोरी प्रकार, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:49 IST

सहा संशयित आरोपींना अटक 

राजेंद्र पाटीलभोगावती : कौलव (ता.राधानगरी) येथे गुप्तधन अमिषापोटी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कौलचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड होऊन सहा संशयित आरोपींना काल, मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागणारी अशी ही घटना आहे.    घटनास्थळावरून आणि राधानगरीपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौलव येथील शरद धर्मा कांबळे या युवकाने घरात असलेल्या गुप्तधनप्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार सुरू केला होता. त्याच्या राहत्या घरी देवाऱ्याच्या समोर तीन ते चार फुटाचा खड्डा काढून विधिवत पूजा केली जात असल्याचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी शरद धर्मा माने (रा कौलव), महेश सदाशिव माने (रा. राजमाची ता. कराड जि. सातारा),  अशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ ( दोघे रा मंगळवार पेठ कराड जि. सातारा), संतोष निवृत्ती लोहार (रा. वाझोली ता. पाटण जि. सातारा), कृष्णात बापु पाटील (रा. पुलाची शिरोली ता. हातकणगले) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली.सरपंच कुंभार आणि माजी उपसरपंच व फिर्यादी अजित पाटील यांना सांगितले की, गेले काही दिवसापासून या घरात काही धार्मिक विधी केले जात होते. याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर या घरात थेट प्रवेश केला. त्यावेळी एका चटईवर केळीचे पानावरती हळद-कुंकु सुपारी, नारळ पानाचे विडे, लिंबु त्याला टाचण्या मारलेल्या अशी पुजा करत असलेचे दिसले. त्यातील संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा काही मंत्रोउच्चार करत होता. त्याचे गळ्यामध्ये रुद्राक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या. त्याच्याशेजारी संशयित आरोपी शरद माने बसलेला होता. 

आतील खोलीत गेले असता तेथे देव घराचे समोर अंदाजे तीन ते चार फुटाचा खड्डा काढला होता. फिर्यादी पाटील यांनी आरोपींना याबाबत विचारले असता संशयित आरोपी संतोष लोहार याने या खड्‌ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे त्यासाठी ही पुजा करत आहोत असे सांगितले. तेथील संशयित आरोपी आशिष चव्हाण याने येथुन निघुन जावा अन्यथा तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अजित पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीradhanagari-acराधानगरीPoliceपोलिस