शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई; बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यानं 'शहबाज' सरकार बिथरलं
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
5
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
6
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
7
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
8
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
9
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
10
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
11
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
12
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
13
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
15
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
16
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
17
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

Kolhapur News: पांढऱ्या फडक्यात जनावराचे काळीज, कुंकू, गुलाल, लिंबू; इंगळीत मध्यरात्रीच तरुणांनी मांडली अघोरी पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:06 IST

पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली

कोल्हापूर-हुपरी : वेळ मध्यरात्रीची...काही तरुण अचानक बाहेर पडतात अन पांढऱ्या फडक्यात ठेवलेले प्राण्यांचे अवयव, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग थेट वेशीवर आणून ठेवतात. हे सगळे पाहून कुणीही घाबरेल...इंगळी (ता. हातकणंगले) या गावात ऐन दिवाळीत घडलेल्या या अघोरी पूजेने हातकणंगले तालुका भयभीत झाला आहे. सद्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.इंगळीत आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचे उघड झाले आहे. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तरुण गावात संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत. पहाटे गावकऱ्यांनी इंगळी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागीच पांढऱ्या फडक्यात ठेवलेले जनावराचे काळीज, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग पाहिला. या दृश्याने ग्रामस्थांना धक्का बसला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासही सुरू केला आहे. हा प्रकार कोणत्यातरी अघोरी पूजेचा भाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या वेळी प्रकारइंगळी परिसरात काही वर्षांपूर्वी अशाच स्वरूपाची घटना घडली होती. त्या वेळीही गावाच्या बाहेर अघोरी वस्तू आणि प्राण्यांचे अवयव आढळले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Occult Rituals Terrorize Village During Diwali, Police Investigate

Web Summary : Aghori puja, including animal organs, terrorized Ingali village near Kolhapur during Diwali. CCTV footage shows suspicious activity. Police are investigating the incident, sparking fear among residents after a similar event years ago.