शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

आक्रमक सभासद... हतबल संचालक

By admin | Updated: October 1, 2015 23:20 IST

‘आजरा’च्या वार्षिक सभेतील चित्र : सभासदांच्या मनात कारभाराबाबत प्रश्नांचे वादळ

ज्योतिप्रसाद सावंत -- आजरा -वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे सभासदांचे हक्काचे व्यासपीठ असणारे ठिकाण. संचालक मंडळातील अंतर्गत वाद, कुरबुरी आपापल्या समर्थक सभासदांसमोर आल्या की नकळतपणे त्यांचे भांडवल वार्षिक सर्वसाधारण सभेत होते. सभासदांना आकडेवारीनिशी माहिती उपलब्ध होत असल्याने सभेवेळी प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्यानंतर सभासदांचे आरोप धड नाकारता येते नाहीत व धड मान्यही करता येत नाहीत असा विचीत्र प्रकार आजरा कारखान्याच्या वार्षिक सभेत अनुभवास आला.सत्काराला व पोलीस बंदोबस्ताला फाटा देत सभा पार पडली, हे या सभेचे मुख्य वैशिष्ट्य होते. मात्र, सुरुवातीपासूनच सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न अभ्यासपूर्ण तर होतेच, पण संचालकांना आत्मचिंतन करावयास लावणारे ठरले. शेअर रक्कम तीन हजारांवरून दहा हजार रुपये करण्यात आली असल्याचे सभेत सांगण्यात आले. सभासदांचा ऊस वेळेवर उचल होत नाही, कारखाना तोट्यातच असल्याचे सभासदांना शेअर रकमेपासून परतावा काहीच नाही, असे असताना वाढीव शेअर रकमा सभासदांनी का भराव्यात, या प्रश्नाचे निश्चितच संचालक मंडळाकडे समाधानकारक उत्तर नाही.शेतात पाणी वेळेवर मिळत नसताना पाटबंधारे खात्याची पाणीपट्टी परस्पर कारखाना शेतकऱ्यांच्या बिलातून वर्ग करण्यामागचे कारणही स्पष्ट होत नाही. स्क्रॅप विक्रीबाबत संचालक मंडळाचे नेमके अधिकार काय आहेत. कायद्याच्या चौकटीत सदर विक्री बसते का ? वारणा-आजराच्या भागीदारी कराराचे प्रश्न अद्याप अपूर्ण का आहेत? वाढीव सभासद करण्याचा अट्टहास का ? कामगारांबाबत सापत्नभावाची वागणूक का? बँकांची कर्जे, संचालकांची मौजमजा, गाड्या यांसह विविध बाबी सभासदांनी सभेत उपस्थित केल्या.निवडणूक डोळ्यासमोर असताना सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ राजकीय उद्देशाने नव्हे, तर ‘कारखाना’ कारभाराकडे सभासद डोळे उघडे ठेवून आहेत याची जाणीव करून देणारे होते. याचे स्मरण संचालक व अधिकाऱ्यांची ठेवणे गरजेचे आहे. अहवालातील काही त्रुटी या गंभीर आहेत. संचालकांना सभासदांनी ‘कारभारा’बाबत डोस दिला आहे. प्रत्येक गोष्टीला विद्यमान संचालक मंडळातील प्रत्येक संचालक कायद्याने जबाबदार आहे. त्यामुळे काही संचालक घडणाऱ्या बाबींशी कांही संबंध नाही, असे म्हणू शकत नाहीत.कारखाना निवडणुकीचे नगारे वाजत असताना सभासदांच्या मनता कारभाराबाबत प्रश्नांचे वादळ निर्माण होऊ लागले, तर या वादळात अनेक संचालकांच्या राजकीय नौका भरकटल्याशिवाय राहणार नाहीत. याचे भान ठेवून, येत्या गळीत हंगामाला सामोरे जाण्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही.