शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

‘एजंट’ना आरटीओेचा दरवाजा बंद

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

कार्यालयाबाहेर निदर्शने : वाहनमालकांचे प्रतिनिधी म्हणून काम करू देण्याची मागणी

कोल्हापूर : आम्ही सर्व मोटार वाहनमालकांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी आरटीओ कार्यालयात येत आहोत. त्यामुळे आम्हाला १९९२ च्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार काम करण्यास द्यावे, अशी मागणी करीत कोल्हापुरातील सर्व आरटीओ एजंटांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेरील आपले सर्व व्यवहार बंद ठेवले व काहीकाळ निदर्शने केली. यामुळे या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आज, गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करणाऱ्या सर्व एजंटांनी सकाळपासून काम बंद केले. यावेळी सर्वांनी एकत्रित येत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांची भेट घेतली. यावेळी एजंटांनी आम्हाला मोटार वाहनमालकांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यास द्यावे, अशी मागणी केली. मात्र, वर्मा यांनी ती फेटाळून लावली; कारण एकाच मालकाच्या कार्यालयात वारंवार काम असत नाही. त्याचबरोबर अनेकजणांची कामे अ‍ॅथॉरिटी पत्र घेऊन करता येणार नाहीत. त्यावर एजंटांनी कोर्टात वकील कसे काम करतात, असा सवाल विचारला. त्यावर उपप्रादेशिक अधिकारी वर्मा यांनी आपल्याकडे त्यांच्याप्रमाणे शिक्षण, बार कौन्सिलची सनद, आदी सर्व असते. त्याचप्रमाणे आपल्या कार्यालयात केवळ आपण एकाच व्यक्तीचे काम एकाच वेळी आणू शकतो. तेही त्या व्यक्तीने अ‍ॅथॉरिटी पत्र देणे बंधनकारक आहे. अनेक व्यक्तींची कामे केली जातात, त्यावेळी एजंट म्हणून आम्ही तुम्हाला कार्यालयाबाहेर काढू, असे सांगितले. यावर समाधान न झाल्याने एजंटांनी कार्यालयाबाहेर परिवहन आयुक्त व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. (प्रतिनिधी)आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारात एक अधिकारी व कर्मचारी नियुक्त केला आहे. या परिसरावर टेहळणी करण्यासाठी १६ सीसीटीव्हीसुद्धा बसविण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांनीही अनधिकृत व्यक्तींबरोबर मदत घेऊ नये- राजेंद्र वर्मा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.डीलर, ड्रायव्हिंग स्कूल, पीयूसी केंद्राचे प्रतिनिधी यांनाही प्रतिबंध घालावा. तसेच संगणक व साहेबांचे पैसे गोळा करणाऱ्या पंटरांनाही कार्यालयाबाहेर घालवावे. - सुभाष शेटे, करवीर आॅटो रिक्षा युनियन आम्ही वाहनमालकांचे प्रतिनिधी म्हणून काम करतो आहोत. त्यामुळे आम्हाला यापुढेही कामकाज करण्यास मज्जाव करू नये. आयुक्तांनीही या निर्णयाचा फेरविचार करावा. आता आॅनलाईन लायसेन्स असल्याने इतर कामकाजास रोखू नये. - भूषण कावळे, एजंट प्रतिनिधीछोटे गेट बंद कार्यालयाबाहेरील दोन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. याशिवाय चौकाकडील छोटे गेटही बंद करण्यात आले आहे. तसेच मुख्य दरवाजावर एक अधिकारी व एक कर्मचारी नियुक्त केला आहे. याशिवाय कार्यालयाच्या विविध ठिकाणी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याद्वारे दलालांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. गटतटाचे राजकारण येथेही एक गट शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होता. मात्र, दुसऱ्या गटाच्या एजंटांनी यामध्ये येत आयुक्तांच्या व प्रादेशिक परिवहन कार्यालयाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे येथून अनेकांनी काढता पाय घेतला. तसेच मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी जाता-जाता आंदोलनात नेहमीप्रमाणे सहभाग घेत निदर्शने केली.