शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

बोगस कर्जप्रकरणी आयडीबीआयच्या व्यवस्थापकासह वकिलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 1:03 AM

खातेदाराच्या नावावर एकही गुंठा जमीन नसताना बनावट सर्च रिपोर्ट देणे व कागदपत्रांची तपासणी न करणे, स्पॉट व्हिजिट न करता बोगस पीक कर्ज व पाईपलाईन कर्जप्रकरण मंजूर करणाऱ्या वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या तत्कालीन शाखा

ठळक मुद्देम्हालसवडेतील पीक कर्जे भोवली : सुमारे ८ कोटींची फसवणूक; ४५० खातेदारतपास अधिकारी अरविंद कांबळे यांनी केली स्वतंत्ररीत्या चौकशी .

कोल्हापूर : खातेदाराच्या नावावर एकही गुंठा जमीन नसताना बनावट सर्च रिपोर्ट देणे व कागदपत्रांची तपासणी न करणे, स्पॉट व्हिजिट न करता बोगस पीक कर्ज व पाईपलाईन कर्जप्रकरण मंजूर करणाऱ्या वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह बँकेच्या पॅनेलवरील वकिलास करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

तत्कालीन शाखा व्यवस्थापक जयंत यशवंत गंदे (वय ४९, रा. रॉयल अपार्टमेंट, शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि सी. जी. कुलकर्णी (५९, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या प्रकरणात यापूर्वी चारजणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेत पीक व पाईपलाईन कर्ज मिळण्याकरिता राजाराम दादू पाटील याने २०१६ साली म्हालसवडे गावच्या तलाठ्याच्या सही-शिक्क्याचे आठ अ आणि सात-बाराचे खोटे उतारे देऊन बँकेकडून २३ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. हा प्रकार आॅक्टोबर २०१८ मध्ये उघडकीस आला होता.

या बोगस कर्ज प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, त्यामध्ये बॅँकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता गृहीत धरून करवीर पोलिसांनी तपास सुरू केला होता. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक गंदे यांनी कर्जदार यांच्याकडून आलेली कागदपत्रे पडताळणी न करता, तसेच स्पॉट व्हिजिट न देता कर्जप्रकरण मंजूर केले. या दोघांकडे तपास अधिकारी अरविंद कांबळे यांनी स्वतंत्ररीत्या चौकशी केली. चौकशीत दोघे दोषी आढळून आले. या फसवणुकीची रक्कम सुमारे आठ कोटी असून, ४५० कर्जदारांच्या नावांखाली ही रक्कम उचलण्यात आल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे शुक्रवारी करवीर पोलिसांनी दोघांनाही या प्रकरणी सहआरोपी करून अटक केलीे.

एकाच कुटुंबात २३ लाखांचे कर्जवाटपबॅँकेच्या नियमानुसार कर्जदाराच्या घरी जाऊन स्पॉट व्हिजिट देणे अपेक्षित असताना शाखा व्यवस्थापक गंदे यांनी ते न करता एकाच कुटुंबात २३ लाखांचे कर्ज दिले. मुख्य संशयित राजाराम पाटील याने पाच वर्षांसाठी ४ लाख ११ हजार, त्याची पत्नी राणीताई हिने ३ लाख ३४ हजार, मुलगा सचिन ३ लाख ७६ हजार ८००, सुमित ३ लाख २५ हजार ४००, सून सुमन ४ लाख ११ हजार, रेश्मा ३ लाख ७६ हजार ८०० रुपये असे बँकेकडून पीक व पाईपलाईन योजनेच्या नावाखाली सुमारे २३ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतल्याचे स्पष्ट झाले.संतोष पाटील ब्रेन...यापूर्वी पोलिसांनी फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजाराम पाटील याच्यासह त्याची पत्नी राणीताई पाटील, मुले सचिन आणि सुमित पाटील, सून सुमन सचिन पाटील, रेश्मा सुमित पाटील, तसेच तलाठ्याच्या सही-शिक्क्याचा बनावट सात-बारा आठ-अ पुरवठा करणाऱ्या व या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या संतोष पाटील याला अटक केली आहे.

लोकमत’चा संशय खरा ठरलापीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १३ आॅक्टोबर २०१८ ला दिले होते. या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु कर्जाची नोंद संबंधित शेतकºयांच्या सातबारा उताºयावर झालेलीच नाही. त्यामुळे या फसवणुकीतील रक्कम वसूल होण्याची शक्यताही धूसर आहे. व्यवस्थापक जयंत गंदे हेच या प्रकरणी जबाबदार असल्याचे त्या वृत्तात म्हटले होते. त्यांना अटक झाल्याने तो संशय खरा ठरला

 

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकPoliceपोलिस