शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:41 IST

तालुक्यात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक गावाला किमान एक कोटीचा निधी मिळाला असल्याचे सांगत इतिहासात हे पहिल्यांदाच झाल्याचेही ते म्हणाले.

जयसिंगपूर : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्याने आज, जयसिंगपुरातील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढून हल्लाबोल केला. दरम्यान यड्रावकर गटाचे समर्थकही कार्यालयावर जमा झाले होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र संतप्त शिवसैनिकांनी बॅरिकेट तोडून, पोलिसांशी झटापट करुन यड्रावकरांच्या कार्यालयावर धडक मारली. यावेळी पोलीस व शिवसैनिकात झटापट झाल्याने वातावरण तणावपुर्ण बनले होते.   यासर्व प्रकारानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्हॉटसअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले त्या लोकांनी मोर्चा काढून आम्हाला विचारायला येणं हे हास्यास्पद आहे. मोर्चा काढून चुकीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. कुठंतरी मला बदनाम करण्याचा डाव असून मी कुणी लेचापेचा नाही असा इशाराच त्यांनी विरोधक आंदोलकांना यावेळी दिला.तर, येणाऱ्या काळात अपक्ष म्हणूनच आपली भूमिका राहील असे स्पष्ट सांगितले. विकासासोबत राहणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक गावाला किमान एक कोटीचा निधी मिळाला असल्याचे सांगत इतिहासात  हे पहिल्यांदाच झाल्याचेही ते म्हणाले. विकासाची गती कायम ठेवायची असल्यास एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी राहणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ