शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वाद मिटवून हॉटेलमध्ये जेवले अन् पार्किंगमध्ये पुन्हा भिडले, पाच जण जखमी; १४ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:28 IST

शिरोली पोलिसांनी नऊ जणांना अटक केली

कोल्हापूर/शिरोली : व्यावसायिक वादातून आठ दिवसांपूर्वी झालेले भांडण शनिवारी रात्री मिटवून त्याचा आनंद सांगली फाट्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करुन साजरा केला. मात्र, जेवण करुन बाहेर पडताना पार्किंगमध्ये पुन्हा वाद झाला आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले.दोन्ही गटांतील जखमी उपचारासाठी सीपीआरमध्ये पोहोचल्यानंतर, पुन्हा दोन्ही गट आमने-सामने भिडल्याने सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर राडा झाला. दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात १४ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, शिरोली पोलिसांनी नऊ जणांना अटक केली.शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी सनदे, श्रीकांत मोहिते आणि अनिकेत लाड यांचा व्यवसायातील पूर्व वैमनस्यातून आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. वाद मिटविण्यासाठी शनिवारी सांगली फाटा येथील एका हॉटेलमध्ये सर्व जण एकत्र आले. जेवण झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास हाॅटेलच्या पार्किंगमध्ये दोन गटांत पुन्हा वाद होऊन मारामारी झाली. अनिकेत लाड, विनायक लाड, श्रीकांत कोळी, पृथ्वीराज यादव, शुभम यादव, आशिष वाडकर, साहिल आयवळे, आदीनाथ यादव, मनिष कुरणे, रूपेश कांबळे, अजय कांबळे यांनी विकी आप्पासाहेब सनदे आणि श्रीकांत मोहिते या दोघांना एडक्यासह काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी सीपीआरमध्ये पोहोचल्यानंतर तिथे पुन्हा दोन्ही गट आमने-सामने भिडल्याने राडा झाला. हल्लेखोरांनी विनायक लाड याच्या आलिशान कारवर दगड घालून तोडफोड केली. याबाबत शिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, ११ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी नऊ जणांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.

रुग्णालयात तणावमध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर दोन्ही गटांत पुन्हा मारामारी झाली. यावेळी हल्लेखोरांनी कारची तोडफोड केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना पांगवले. पृथ्वीराज गजानन यादव (वय २२, रा.शिरोली पुलाची) याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रोहित सातपुते, विकास धनवडे आणि रणजीत मोहिते या तिघांवर गुन्हा दाखल केला.

यांना झाली अटकअनिकेत सुकुमार लाड, विनायक सुकुमार लाड, श्रीकांत कोळी, शुभम यादव, आशिष वाडकर, साहिल आयवळे, मनिष कुरणे, रूपेश कांबळे, अजय कांबळे या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली. विकी सनदे याने फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस