पेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 13:05 IST2018-04-28T13:05:29+5:302018-04-28T13:05:29+5:30
राहुल पारेकरच्या खिशात पोलिसांना सुसाइट नोट सापडली आहे.

पेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे एका महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने पेपर अवघड गेलेच्या नैराश्येतून शनिवारी पहाटे धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. राहुल भैरवनाथ पारेकर (वय २०, रा. पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
राहुल पारेकरच्या खिशात पोलिसांना सुसाइट नोट सापडली आहे. पेपर कठीण गेल्याने आत्महत्या करत असल्याचं त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. तसंच आत्महत्येसाठी कुठालाही जबाबदार धरू नये, असंही त्याने सुसाइट नोटमध्ये लिहिलं आहे.