शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर भाजीपाला कडाडला, किरकोळ बाजारात दुप्पट दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:38 IST

लॉकडाऊन उठविल्यानंतर सोमवारी कोल्हापुरात भाजीपाला चांगलाच कडाडला. भाज्यांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सात दिवसांनंतर मंडई सुरू झाल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

ठळक मुद्देलॉकडाऊननंतर भाजीपाला कडाडला, किरकोळ बाजारात दुप्पट दर खरेदीसाठीही झुंबड : बाजार समितीत नेहमीपेक्षा ७०० क्विंटल आवक कमी

कोल्हापूर : लॉकडाऊन उठविल्यानंतर सोमवारी कोल्हापुरात भाजीपाला चांगलाच कडाडला. भाज्यांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सात दिवसांनंतर मंडई सुरू झाल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कोल्हापूरबाजार समितीत सोमवारी केवळ १००३ क्विंटलची आवक झाली असून, नेहमीपेक्षा ७०० क्विंटल कमी झाली.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २० जुलैपासून सात दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यात या लॉकडाऊनमध्ये बाजार समितीही सहभागी झाल्याने मंडई बंद राहिल्या. त्यामुळे लॉकडाऊन कधी उठतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री अधिकृतरीत्या लॉकडाऊन शिथिल केल्याची घोषणा केली.

त्यानंतर शेतकऱ्यांना बाजार समितीत भाजीपाला घेऊन येण्यासाठी निरोप देण्यात आले. मात्र, रात्री बारापर्यंत जेमतेम पाच-सहा गाडीच भाजीपाला आला होता. सकाळच्या टप्प्यात काही गाड्या आल्या, मात्र खरेदीदारांची गर्दी मोठी होती. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यापारी समितीत आले आणि भाजीपाला कमी असल्याने दर चांगलेच कडाडले.त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारात झाला असून, सोमवारी दिवसभर भाजीपाल्यांचे दर भडकले होते. किरकोळ बाजारात दोडका ६०, वांगी ६०, ढब्बू ८०, गवारी १००, वरणा ८०, घेवडा ८०, तर भेंडी ४० रुपये किलो होती. एरव्ही वीस रुपये किलो असणारा टोमॅटोने चांगलीच उसळी घेतली असून, ६० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला. ओली मिरचीने शंभरी पार केली. शेवग्याच्या दोन शेंगा दहा रुपयांना होत्या. त्या तुलनेत कोथिंबीरचे दर काहीसे स्थिर राहिले.ग्राहकांना दुहेरी झटका!लॉकडाऊनमुळे सात दिवस हाताला काम नाही. त्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट झाल्याने सामान्य ग्राहकांची भाजीप खरेदी करताना दमछाक झाल्याचे दिसले.किरकोळ बाजारात सोमवारी भाज्यांचे प्रतिकिलोचे दर असे राहिले-भाजी दर

  • दोडका ६०
  • वांगी ६०
  • ढब्बू ८०
  • गवारी १००
  • वरणा ८०
  • घेवडा ८०
  • कोबी ३०
  • भेंडी ४०
  • ओली मिरची १००
  • आल्ले ८०
  • मेथी २० (पेंढी)
  • पालक १५
  • शेपू १५

बाजार समितीतील शेतीमालाची आवक क्विंटलमध्ये -शेतीमाल आवक

  • भाजीपाला १००३
  • कांदा २९०८
  • बटाटा ३२६७
  • लसूण २२०
  • फळे २३१

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMarketबाजारkolhapurकोल्हापूर