शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: October 16, 2015 00:40 IST

हसन मुश्रीफ : महापालिकेसाठी ‘कागल’मधील दहा हजार कार्यकर्ते दसऱ्यादिवशी कोल्हापुरात

कागल : लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा अश्वमेध सुरू आहे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पाठीशी असल्याने मनपा निवडणुकीतही विजयाचा अश्वमेध कायम राहील. कोल्हापूरकर आणि कागलकरांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. कागल तालुक्यातील दहा हजार कार्यकर्ते दसऱ्यादिवशी कोल्हापूरकरांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रवादीची भूमिका मांडतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी येथील शाहू सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, नवीद मुश्रीफ, तालुका संघाचे अध्यक्ष शशिकांत खोत, गणपतराव फराकटे, आदी प्रमुख उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीच हवा शहरात आहे. म्हणून कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शहरातील आपले नातेवाईक, मित्र, स्नेही, सामान्य जनतेची भेट घेऊन संवाद साधावा. त्यासाठी दसऱ्याचा दिवस योग्य असून, चांगल्या विचारांचे सोने वाटप करावे. भाजप-सेना युतीचे सरकार गोरगरिबांच्या सर्व योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. बांधकाम कामगार, निराधार, अपंग, दलित, घरेलू कामगार अशा असंख्य घटकांवर अन्याय करीत आहे. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी दिवाळीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर एक लाख लोकांचा मोर्चा काढू. ‘न भूतो, न भविष्यती’ असा हा मोर्चा असेल. यावेळी युवराज पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला ४० ते ४५ जागा हमखास मिळतील, असे सर्वांच्या लक्षात आलेले आहे. यावेळी डी. डी. चौगुले, भैया माने, शशिकांत खोत यांचीही भाषणे झाली. लाटण्याने स्वागत करामुश्रीफ म्हणाले, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी यापूर्वी राधानगरी-भुदरगड महसूल कर्मचाऱ्यांतर्फे केली. आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीतील अधिकाऱ्यांकडून चौकशी करीत आहेत. त्यांचे स्वागत लाटण्याने केल्याशिवाय राहणार नाहीत. राजे-मंडलिकांची पोकळीमाजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. आपण त्यांच्या कार्याचा हा वसा पुढे नेऊया. त्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवूया, असे मुश्रीफ म्हणाले.