दिल्ली पाठोपाठ कोल्हापुरातही झळकले 'मोदी हटाव, देश बचाव'चे बॅनर, रंगली जोरदार चर्चा

By समीर देशपांडे | Updated: March 30, 2023 13:13 IST2023-03-30T13:12:19+5:302023-03-30T13:13:52+5:30

विविध प्रमुख चौकात लावण्यात आले बॅनर

After Delhi Kolhapur also saw the banner of Modi Hatav, Desh Bhachav | दिल्ली पाठोपाठ कोल्हापुरातही झळकले 'मोदी हटाव, देश बचाव'चे बॅनर, रंगली जोरदार चर्चा

दिल्ली पाठोपाठ कोल्हापुरातही झळकले 'मोदी हटाव, देश बचाव'चे बॅनर, रंगली जोरदार चर्चा

कोल्हापूर : शहरात गुरुवारी सकाळी 'मोदी हटाव, देश बचाव' असे बॅनर लावल्याचे समोर आले. सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली. परंतु हे बॅनर कोणी लावले याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, हे फलक आप'ने लावल्याचे स्पष्ट झाले असून ते याबाबत दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

देशात राष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या घडामोडी, अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यामुळे संसदेत सुरू असलेला गोंधळ या पार्श्वभूमीवर हे बॅनर आणखी चर्चेत आहेत. विविध प्रमुख चौकात हे बॅनर लावण्यात आले होते. देवकर पाणंद येथे एका नागरिकाने स्वतःहून बॅनर काढून फेकून दिले. दरम्यान अन्य ठिकाणी नागरिकांनी तर काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर काढून टाकले आहेत.

Web Title: After Delhi Kolhapur also saw the banner of Modi Hatav, Desh Bhachav