शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

करवीरमध्ये १७ ग्रामपंचायतींत सत्तांतर

By admin | Updated: July 28, 2015 01:23 IST

स्थानिक आघाड्यांसह काँग्रेसचा वरचष्मा : सडोली पी. एन. पाटलांकडे, कोपार्डे, शिये, कुडित्रे शिवसेनेकडे

कसबा बावडा : करवीर तालुक्यात अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १७ ठिकाणी सत्तांतर झाले, तर २० ठिकाणी सत्ता कायम राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले. अन्य ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे. निकालामध्ये स्थानिक आघाडींसह कॉँग्रेसने आपला वरचष्मा कायम राखला आहे. कोपार्डे, खटांगळे, कुडित्रे, शियेमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली. निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींमध्ये ८० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत स्थानिक पातळीवरील नेत्यांसह तालुका स्तरावरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. करवीर मतदारसंघात कॉँग्रेस विरोधात शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी कॉँग्रेस अंतर्गत लढाई झाली. दक्षिणेत मात्र काही गावांचा अपवाद वगळता माजी गृहराज्यमंत्री सत्तेज पाटील व महाडिक गटांत सामना झाला. करवीरमध्ये कॉँग्रेसने, तर दक्षिणमध्ये सतेज पाटील गटाने बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आपले वर्चस्व राखले. नरके गटाने काही महत्त्वपूर्ण गावांत सत्तांतर घडवून सेनेने वर्चस्व दाखविले. सडोली खालसा गावात सत्तांतर घडवून माजी आमदार पी. एन. पाटील गटाने सत्ता काबीज केली. सडोली खालसा गावात नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.सोमवारी सकाळी ९ वाजता कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी झाली. मतमोजणीसाठी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमारे व नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी एकाचवेळी सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी न घेता मतमोजणीच्या नऊ फेऱ्या केल्या. प्रत्येक फेरीत पाच ते सहा ग्रामपंचायतींची मोजणी करण्यात आली. अवघ्या १५ ते २० मिनिटांत ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होत होते. निकाल लागलेले उमेदवार बाहेर गेल्यावरच दुसऱ्या पाच-सहा ग्रामपंचायतींना आत घेतले जात होते. त्यामुळे मतमोजणी अवघ्या तीन तासांत शांततेत पार पडली. यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)एकादशीला त्यांना पांडुरंग पावलागिरगाव व कोगील बुद्रक ग्रामपंचायतींमध्ये दोन्हीही उमेदवारांना समान मते पडली. गिरगाव ग्रामपंचायतीच्या सुरेश पाटील व सुरेश जाधव यांना समान ३३२ मते पडली. चिठ्ठीद्वारे सुरेश पाटील विजयी झाले. कोगील बुद्रुकमध्ये चिठ्ठीद्वारे रघुनाथ गणेशाचार्य विजयी झाली. चिठ्ठीद्वारे विजय झाल्यामुळे पांडुरंग पावला, अशी चर्चा मतमोजणीवेळी झाली.केर्ली येथे त्रिशंकू स्थितीकेर्ली ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्थेमुळे सत्तेचा गुंता निर्माण झाला आहे. एकूण १३ पैकी ५ जागा सत्ताधारी विष्णू पाटील गटाला, बाबासाहेब चौगुले गटाला ४, माजी सरपंच विश्वनाथ पोवार यांच्या गटाला चार जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदासाठी तिन्ही गटांनी दावा केल्यामुळे पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे.सत्तांतर झालेल्या ग्रामपंचायतीहालसवडे, निगवे दुमाला, कुडित्रे, हळदी, सडोली खालसा, म्हालसवडे, घानवडे, आरे, खुपीरे, पाटेकरवाडी, कोगील खुर्द, पडवळवाडी, शिये, कळंबे तर्फ कळे, कोपार्डे, महे.