प्रशासक राजेंद्र तळपे यांनी स्वीकारला कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:25 IST2020-08-31T18:21:50+5:302020-08-31T18:25:01+5:30
सरपंचपदाचा कार्यकाल संपल्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार प्रशासक राजेंद्र तळपे यांनी सोमवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून स्वीकारला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.

कोडोली ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारलेल्या राजेंद्र तळपे यांचा सत्कार सरपंच शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
कोडोली - सरपंचपदाचा कार्यकाल संपल्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार प्रशासक राजेंद्र तळपे यांनी सोमवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून स्वीकारला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
कोडोली ग्रामपंचायत सभागृहात प्रशासक तळपे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यकाल संपलेल्या सरपंच शंकर पाटील, उप सरपंच चंद्रभागा जाधव यांचा सत्कार प्रशासक राजेंद्र तळपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पदभार स्विकारताना तळपे म्हणाले, ग्रामपंचायतीचा कारभार सर्वाना विश्वात घेऊनच चालविण्यात येईल. यावेळी माजी सरपंच नितीन कापरे, माजी उपसरपंच निखिल पाटील, ग्रामविकास अधिकारी ए वाय. कदम, प्रविण जाधव, माणिक मोरे, तलाठी अनिल पोवार, एम. पी पाटील, मोहन कुंभार व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. आभार सुनिल पाटील यांनी मानले.