मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST2020-12-24T04:20:44+5:302020-12-24T04:20:44+5:30
निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. येत्या तीस तारखेला निकाल हाती येणार आहेत. ...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. येत्या तीस तारखेला निकाल हाती येणार आहेत. निपाणी तालुक्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच पहिल्याच निवडणुकीची मतमोजणी निपाणी येथे होणार आहे. यामुळे निपाणी तालुक्यातील नागरिकांची उत्सुकता अजून ताणली गेली आहे. २१८ बूथवर झालेल्या मतदानातून ४९८ उमेदवार निवडले जाणार आहेत. १ लाख ५३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
केएलई संस्थेच्या बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. आताच्या घडीला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ तिरंगी व प्रसंगी चौरंगी लढती होणार आहेत. तालुका निर्मितीनंतर प्रथमच प्रशासनाने स्थानिक पातळीवर मतमोजणी ठेवली आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची लगबग सुरू आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.