पन्हाळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:05+5:302021-01-13T05:05:05+5:30
३९ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३८२ उमेदवार निवडून येणार आहेत. यात ३४ अनुसूचित जातींमधील असणार आहेत. ४७ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गातील ...

पन्हाळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी प्रशासन सज्ज
३९ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३८२ उमेदवार निवडून येणार आहेत. यात ३४ अनुसूचित जातींमधील असणार आहेत. ४७ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गातील आहेत. ५४ नागरिकांचा मागास वर्ग स्त्री, २० अनुसूचित जाती स्त्री, १३८ सर्वसाधारण व ८९ अनारक्षित असून एकूण मतदार संख्या ९१३५७ इतकी असणार आहे. यात ४७,६५३ हे पुरुष मतदार असून ४३,९४४ या स्त्री मतदार असणार आहेत. इतर मतदार २ आहेत. १५६ मतदार केंद्रे १३० प्रभाग राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचारी आहेत.
मतमोजणी १८ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून नगरपरिषद सांस्कृतिक हाॅल पन्हाळा येथे ९ फेऱ्यांमध्ये १८ टेबलवर पार पडेल.