शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

धामोड आरोग्य केंद्राचा पंचनामा -सोयी-सुविधांबाबत प्रशासन धारेवर :

By admin | Updated: July 30, 2014 00:30 IST

विजय सूर्यवंशी यांच्याकडून अचानक पाहणी

धामोड : धामोड (ता. राधानगरी) येथील आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आज, मंगळवारी सुटी असतानाही अचानक भेट देऊन तेथील कामकाजाचा पंचनामा केला. आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधांबाबत त्यांनी प्रशासनास धारेवर धरत चांगली सेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या या भेटीमुळे कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ आणि भंबेरी उडाली.आज, मंगळवारी रमजान ईदची शासकीय सुटी असतानादेखील डॉ. विजय सूर्यवंशी यांनी धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राला दुपारी तीन वाजता भेट दिली. येथील दोनही वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याचे आढळले, तर डॉ. सूर्यवंशी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत आरोग्य केंद्रातील औषध विभाग, आॅपरेशन थिएटर, पुरुष जनरल वॉर्ड, महिला वॉर्ड, जनरेटर रूम व स्वच्छतागृहाची माहिती घेत प्रत्यक्ष भेटी दिल्या. या वॉर्डमधील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्त्री वॉर्डमधील महिलांकडे या आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेबाबत चर्चा केली.

‘लोकमत’शी बोलताना त्यांनी या आरोग्य केंद्रातील काही चुकीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. आरोग्य केंद्र लोकांसाठी आधारवड आहे. रुग्णांना योग्य उपचार देणे कर्तव्य असून, त्यात कोणी कसूर केली तर गय करणार नाही. त्यासंदर्भातला अहवाल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागवला आहे; पण त्याचबरोबर या आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत स्वत: पुढाकार घेऊन विशेष लक्ष देऊन आरोग्य केंद्राची ढासळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य केंद्रातील विद्युत पुरवठ्यासाठी ताबडतोब जनरेटरची व्यवस्था करण्याची ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर) सुटीदिवशीही पाहणीमंगळवारी रमजान ईदची शासकीय सुटी असतानादेखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘सरकारी’ रुग्णालयाला भेट देऊन, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत माहिती घेतल्याबाबत ग्रामस्थांतून व रुग्णांतून कौतुक झाले.