आदित्यराज घोरपडे यांना युवा पुरस्कार

By Admin | Updated: February 2, 2015 23:46 IST2015-02-02T23:13:28+5:302015-02-02T23:46:57+5:30

महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण २०१२ नुसार शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या या पुरस्काराचे पहिले मानकरी सांगलीचे राष्ट्रीय खेळाडू

Adityasaraj Ghorpade gets the Youth Award | आदित्यराज घोरपडे यांना युवा पुरस्कार

आदित्यराज घोरपडे यांना युवा पुरस्कार

सांगली : ‘लोकमत’चे वार्ताहर आदित्यराज सुभाष घोरपडे यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नुकताच हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण २०१२ नुसार शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या या पुरस्काराचे पहिले मानकरी सांगलीचे राष्ट्रीय खेळाडू आदित्यराज घोरपडे ठरले आहेत.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याहस्ते घोरपडे यांना गौरवण्यात आले. यावेळी खा. संजय पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मनपा आयुक्त अजीज कारचे, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार पवार, माजी आमदार हाफिज धत्तुरे, नगरसेवक पांडुरंग भिसे आदी उपस्थित होते.
रोख रक्कम दहा हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. घोरपडे हे तलवारबाजी (फेन्सिंग) या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू असून, सांगली अ‍ॅमॅच्युअर फेन्सिंग असोसिएशनचे सहसचिव आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Adityasaraj Ghorpade gets the Youth Award