आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:39 IST2018-12-17T14:38:13+5:302018-12-17T14:39:30+5:30

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे उद्या, मंगळवारी कोल्हापूर दौºयावर येत आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात आठ ठिकाणी विविध कार्यक्रमाने ते उपस्थित राहणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आहे.

Aditya Thakare tomorrow on Kolhapur tour | आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

ठळक मुद्देआदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावरजिल्ह्यात आठ ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

कोल्हापूर : शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे उद्या, मंगळवारी कोल्हापूर दौºयावर येत आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात आठ ठिकाणी विविध कार्यक्रमाने ते उपस्थित राहणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आहे.

आदित्य ठाकरे उद्या, सकाळी आठ वाजता मुंबईहून बेळगाव विमानतळावर येणार आहेत. तेथून शिनोळी (ता. चंदगड) येथे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संग्राम कुपेकर यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ते करणार आहेत.

दुपारी साडेबारा वाजता यशवंत रेडेकर महाविद्यालय, नेसरीच्या कॉलेज आॅफ फार्मसी युनीटचे उद्घाटन, दुपारी पावणेदोन वाजता आजरा येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन व केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लजच्या ‘एन. आय. सी. यू.’ विभागाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी पाच वाजता ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या घरी जाणार आहेत. बुधवारी (दि. १९) सकाळी आठ वाजता पन्हाळगडावर स्वच्छता मोहिमेस उपस्थित राहणार आहेत.

सरूड (ता. शाहूवाडी) येथील रस्ता उद्घाटन, दुपारी एक वाजता संजय घोडावत विद्यापीठास भेट देणार आहेत. पावणेतीन वाजता आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हातकणंगले कार्यालयाचे उद्घाटन, दुपारी साडेतीन वाजता शिरोळ येथील रस्त्याचे उद्घाटन करणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी दिली.
 

 

Web Title: Aditya Thakare tomorrow on Kolhapur tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.